शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
3
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
6
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
9
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
10
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
11
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
12
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
13
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
14
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
15
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
16
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
17
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
18
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
19
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
20
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुव्यात ४१ मंडळांकडून घरगुती उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : अक्कलकुवा पोलीस ठाणे हद्दीत सार्वजनिक गणेश मंडळे, वैयक्तिक मूर्ती स्थापना आणि एक गाव एक ...

लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : अक्कलकुवा पोलीस ठाणे हद्दीत सार्वजनिक गणेश मंडळे, वैयक्तिक मूर्ती स्थापना आणि एक गाव एक गणपती या संकल्पनेनुसार ४१ मंडळांकडून गणेशोत्सव साजरा होतो़ यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच मंडळे घरगुती पद्धतीने उत्सव साजरा करत आहेत़
यंदा कोरोना महामारीचे संकट आल्यामुळे या मंडळांनी शासनाच्या निर्देशनाने उत्सव साजरा करण्यास सहमती दिली होती़ उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी याबाबत आवाहन केल्यानंतर मंडळांनी साधेपणाने उत्सव साजरा करण्यावर यंदा भर दिला आहे़ उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डी़डी़पाटील, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर, पोलीस उपनिरीक्षक रूपाली महाजन, पोलीस कॉन्स्टेबल अमोल खवळे, खुशाल माळी आदींकडून वेळोवेळी मंडळांसोबत संपर्क करुन आढावा घेतला जात आहे़
अक्कलकुवा शहरातील विविध भागात स्थापन केलेल्या घरगुती गणेशोत्सवात साधेपणा दिसून येत आहे़

 


अक्कलकुवा ,खापर आणि वाण्याविहीर येथे १६ सार्वजनिक, १३ घरगुती आणि १२ गावांमध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली जाते़ यंदा ही सर्व मंडळे साधेपणाने उत्सव साजरा करण्यासह कोरोनामुक्तीबाबत जागृती करण्यावर भर देत आहेत़ त्यांच्याकडून तशी माहिती भाविकांना दिली जात आहे़ याबाबत पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी सांगितले की, सर्वच मंडळांनी पोलीसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत उत्सव साधेपणाने साजरा केला आहे़ मंडळांनी घेतलेला पुढाकार कौतूकास्पद आहे़