शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यातील ओपन जिमची जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:24 IST

तळोदा येथील तापी माँ परिसरात तळोदा नगरपालिकेच्या क्रीडा विभागाच्या माध्यमातून सन २०१९-२०२० मध्ये ओपन जिम मंजूर झाली होती. ही ...

तळोदा येथील तापी माँ परिसरात तळोदा नगरपालिकेच्या क्रीडा विभागाच्या माध्यमातून सन २०१९-२०२० मध्ये ओपन जिम मंजूर झाली होती. ही जिम काटेरी झाडाझुडपांमध्ये व जमीन ओबडधोबड असणाऱ्या ठिकाणी बसविण्यात आली होती. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. ‘लोकमत’ने याबाबत सचित्र वृत्त प्रसिध्द केले होते. शिवसेनेने यावर आक्रमक भूमिका घेत जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.

या पार्श्वभूमीवर जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी शनिवारी तळोदा येथे भेट देत शहरातील बसविलेल्या ओपन जिमची पाहणी केली. या वेळी त्यांच्यासोबत नगराध्यक्ष अजय परदेशी, शिवसेना शहर प्रमुख जितेंद्र दुबे, जिल्हा क्रीडा कार्यालयाचे मुकेश बारी, महेंद्र काटे, पालिकेचे राजेंद्र माळी आदींसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी तापी माँ नगरमध्ये बसविण्यात आलेल्या ओपन जिमची पाहणी केली. त्यावेळी तेथे जेसीबीच्या सहायाने सपाटीकरण व स्वच्छतेचे काम चालू होते. याठिकाणी पाहणी करून स्थानिक रहिवाशांच्या मागणीनुसार व गरजेनुसार साहित्य बसवून देण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या. नगरसेवकांनी दाखविलेल्या जागेनुसार याठिकाणी साहित्य बसविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. परंतु नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी पालिकेला विश्वासात न घेता ठेकेदाराने ओपन जिमचे साहित्य बसविण्यासाठी घाई केली, त्यामुळे हा प्रकार घडल्याचे सांगितले. तर शिवसेनेचे शहराध्यक्ष जितेंद्र दुबे यांनी ठेकेदाराला साहित्य बसविताना त्याठिकाणी काटेरी झाडे दिसली नाही का? असा सवाल केला.

जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी स्थानिक नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. पाहणीदरम्यान स्थानिक नागरिकांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना निवेदन देत काटेरी झाडे काढून तापी माँ नगरमधील जिम इतरत्र न हलविता याचठिकाणी असू द्यावी, अशी मागणी केली. सिताई नगरमधील ओपन जिमचीही पाहणी केली. त्याठिकाणी असलेले काटेरी झाडेही काढण्याची आवश्यकता असल्याचे दिसून आले. नगराध्यक्ष परदेशी यांनी तत्काळ ते काढण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी शहरात बसविलेल्या सर्व ओपन जिमची पाहणी केली व ठेकेदाराला स्थानिक रहिवाशांची मते जाणून घेत त्यानुसार कामात दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या.

तळोदा शहरात बसविण्यात आलेल्या सर्व ओपन जीमची शनिवारी पाहणी केली. या भेटीत लोकप्रतिनिधींसह स्थानिक रहिवाशांशी चर्चा करून त्यांच्या सूचनेनुसार ओपन जीममध्ये बदल करण्याच्या सूचना दिल्या आहे.

-सुनंदा पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी, नंदुरबार