भटके-विमुक्त हक्क परिषदेची रविवारी जिल्हास्तरीय सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:21 IST2021-06-18T04:21:54+5:302021-06-18T04:21:54+5:30

येथील पेन्शनर भवन, येथे दुपारी दोन वाजता सभा होणार आहे. अध्यक्षस्थानी भटके विमुक्त हक्क परिषदेचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण मोरे तर ...

District level meeting of Bhatke-Vimukta Hakka Parishad on Sunday | भटके-विमुक्त हक्क परिषदेची रविवारी जिल्हास्तरीय सभा

भटके-विमुक्त हक्क परिषदेची रविवारी जिल्हास्तरीय सभा

येथील पेन्शनर भवन, येथे दुपारी दोन वाजता सभा होणार आहे. अध्यक्षस्थानी भटके विमुक्त हक्क परिषदेचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण मोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य प्रदेश संघटक व उ.म.विभाग प्रमुख पुरुषोत्तम काळे व प्रदेश संघटक सुपडू खेडकर उपस्थित असणार आहे. सभेत स्थापन झालेला राज्य मागासवर्ग आयोगाची माहिती सादर करणे, स्थानिक स्वराज्य संस्थेतील व्हीजेएनटी-ओबीसीच्या प्रतिनिधीत्वाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची माहिती अवगत करणे, व्हीजेएनटी-ओबीसी जगगणनासंदर्भात संघटनेची भूमिका ठरविणे, बहुजन हितार्थ स्थापन झालेल्या महाज्योती संस्थेच्या कारभारासंदर्भात माहितीचा मागोवा घेणे, मागासवर्गीय अधिकारी व कर्मचारी यांच्या पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत चर्चा करणे, आदी विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.

भटके विमुक्त समूहातील धनगर, बंजारा, वंजारी, भोई, गोसावी, चित्रकथी, कंजरभाट, वडार, वैदू, बेलदार, गवळी, लोहार, गोंधळी, गोपाळ, तिरमले, ठेलारी, वाघरी, कैकाडीकोल्हाटी, छप्परबंद, सिकलगर आदींसह एकंदरीत संपूर्ण ५३ जाती-उपजातीतील राजकीय, सामाजिक, सेवाभावी संस्थेतील सर्व प्रमुख व सक्रिय समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भटके विमुक्त हक्क परिषदेचे सचिव मनोज चव्हाण, देवा चव्हाण, मनोज बेलदार, दिलीप ढाकणेपाटील, दत्तू सुळ, रवी गोसावी, अविनाश गवळी, शाम राजपूत, जालंधर शिवदे, रघुनाथ बेलदार, राजू गुंजाळ, अशोक वैदू, राजेंद्र जाधव, अंबादास आतारकर, लतेश मोरे, रवी वानखेडे आदींनी केले आहे. सभा कोविड-१९ च्या शासकीय नियमांच्या अधीन राहून पार पडणार आहे.

Web Title: District level meeting of Bhatke-Vimukta Hakka Parishad on Sunday