जिल्हा रुग्णालयाला मिळाली कोवीड टेस्टींग कॅबीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 12:37 IST2020-05-04T12:37:27+5:302020-05-04T12:37:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रुग्णालयाला आयएमए व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने कोवीड टेस्टींग कॅबीन भेट देण्यात ...

The district hospital received a covid testing cabin | जिल्हा रुग्णालयाला मिळाली कोवीड टेस्टींग कॅबीन

जिल्हा रुग्णालयाला मिळाली कोवीड टेस्टींग कॅबीन

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा रुग्णालयाला आयएमए व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने कोवीड टेस्टींग कॅबीन भेट देण्यात आली.
कोरोना आपत्तीमध्ये संशयित रुग्णाचे तपासणीसाठी नमुने जिल्हा रुग्णालयात घेण्यात येतात. हे नमुने घश्यातून घेताना डॉक्टर मंडळींना सुद्धा संसगार्चा धोका असतो ही बाब डॉ.राजेश कोळी यांनी लायन्स क्लबला निदर्शनास आणून दिली व त्यावर उपाय सुद्धा सुचवला. त्यानुसार जळगाव येथील आर्या फाऊंडेशन येथून कोविड टेस्टिंग केबिन मागावण्याचे ठरले.
क्लबच्या सदस्यांनी निधी संकलन केला व सदर केबिन मागवण्यात आली आणि जिल्हा रुग्णालयास सदर केबिन सोपवण्यात आली.
यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी, आयएमएचे अध्यक्ष व लायन्स क्लबचे सदस्य डॉ.राजेश वळवी, डिस्ट्रिक जॉईंट सेक्रेटरी राजेंद्र माहेश्वरी, डॉ.देवेंद्र लांबोळे यांची विशेष उपस्थिती होती. हा प्रोजेक्ट यशस्वी होण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, सिव्हिल हॉस्पिटलचे कोविड नोडल आॅफिसर डॉ.राजेश वसावे यांचे सहकार्य लाभले.
ही केबिन जळगाव जिल्ह्यातून नंदुरबार पर्यंत आणण्यासाठी अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी विशेष सहकार्य केले. या केबिनरुपी सुरक्षा कवचामुळे जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांची सुरक्षा जपली जाणार आहे.हा प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी प्रोजेक्ट चेअरमन डॉ.राजेश कोळी, अध्यक्ष समिरभाई शहा, सचिव सतीश चौधरी, ट्रेझरर नितीन जैन यांनी परिश्रम घेतले.

Web Title: The district hospital received a covid testing cabin