जिल्हा रुग्णालय हाऊसफुल्ल, कोरोना रुग्णांसाठी बेडच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:31 IST2021-03-27T04:31:48+5:302021-03-27T04:31:48+5:30

नंदुरबार : जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी बेड शिल्लक नसल्याची भयानक अवस्था शुक्रवारी स्पष्ट झाली. तसा बोर्ड प्रवेशद्वारावर लावलेला फोटो ...

District Hospital Housefull, Corona has no beds for patients | जिल्हा रुग्णालय हाऊसफुल्ल, कोरोना रुग्णांसाठी बेडच नाही

जिल्हा रुग्णालय हाऊसफुल्ल, कोरोना रुग्णांसाठी बेडच नाही

नंदुरबार : जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी बेड शिल्लक नसल्याची भयानक अवस्था शुक्रवारी स्पष्ट झाली. तसा बोर्ड प्रवेशद्वारावर लावलेला फोटो समाज माध्यांवर व्हायरल झाला. परंतु ही सत्य परिस्थिती असल्याचे जिल्हा रुग्णालय प्रशासनानेही स्पष्ट केेले. १२० बेड असतांना २०० रुग्णांना भरती करावे लागले असून ॲाक्सीजन बेडही कमी पडू लागले आहेत.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा प्रचंड वाढला आहे. सरकारी तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध होत नसल्याने अनेक रुग्णांचे हाल होत आहेत. दोन दिवसांपासून जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षात तर बेडच उपलब्ध नाहीत. १२० बेडची मर्यादा असता २०० बेड टाकले. त्यातही पाच रुग्ण अधीकचे भरती केले. ॲाक्सीजन बेडसाठी तर मोठी वेटींग आहे. ८५ बेड असतांना १३० रुग्ण आहेत. त्यामुळे प्रशासनाची मोठी कसरत होत आहे.

जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लान्ट सुरू आहे. परंतु तोही आता अपुरा पडू लागला आहे. त्यामुळे धुळे येथून अतिरिक्त सिलिंडर मागवावे लागत आहेत. या सर्व परिस्थितीत कर्मचाऱ्यांवर देखील ताण पडत आहे. अतिरिक्त कर्मचारी म्हणून ३० नर्सना ड्युटीचे पत्र दिले असतांना पाचच हजर झाल्या आहेत. त्यामुळे परिस्थिती हाताळतांना कसरत होत असल्याचे चित्र सद्या जिल्हा रुग्णालयात दिसून येत आहे.

Web Title: District Hospital Housefull, Corona has no beds for patients