शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

राज्यापेक्षा जिल्ह्याचा मृत्युदर अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:23 IST

नंदुरबार : राज्याच्या मृत्युदरापेक्षा जिल्ह्याचा मृत्युदर तब्बल ०.४० टक्के अधिक आहे. जिल्ह्यात एकीकडे कोरोना रुग्ण कमी होत असताना दुसरीकडे ...

नंदुरबार : राज्याच्या मृत्युदरापेक्षा जिल्ह्याचा मृत्युदर तब्बल ०.४० टक्के अधिक आहे. जिल्ह्यात एकीकडे कोरोना रुग्ण कमी होत असताना दुसरीकडे कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या कायम आहे. यामुळे एकीकडे दिलासा तर दुसरीकडे चिंता वाढली आहे. वाढत्या कोरोना मृत्युमुळे जिल्हा प्रशासनाचीही चिंता वाढली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा ग्राफ घसरला आहे. दररोज १५ ते ३५ दरम्यान रुग्ण संख्या आढळून येत आहे. त्यामुळे अनेक खासगी कोरोना रुग्णालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. जिल्हा रुग्णालयातदेखील रुग्ण संख्या कमालीची कमी झाली आहे. असे असले तरी कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच राज्याच्या मृत्युदरापेक्षा जिल्ह्याचा मृत्युदर हा ०.४० टक्के आहे. राज्याचा मृत्युदर १.६२ असून नंदुरबार जिल्ह्याचा २.०२ इतका आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा दर स्थिर आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.

दररोज आढळणारे रुग्ण व मृत्यू संख्या यातील तफावत अगदीच कमी राहत आहे. गुरुवार, २७ मे रोजी तर दिवसभरात १७ कोरोना रुग्ण आढळून आले असतांना सात जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलेली होती.

दरम्यान, जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू हे नंदुरबार तालुक्यात तब्बल ३४९ इतके झाले आहेत. त्या खालोखाल शहादा तालुक्यात १९५ जणांचा मृत्यू झाला आहे. नवापूर तालुक्यात १५६, तळोदा तालुक्यात ७६, अक्कलकुवा तालुक्यात २४ तर धडगाव तालुक्यात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हाबाहेरील ७८ जणांचा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.