गुरूवार ते रविवार जनता कर्फ्यूला प्रतिसाद देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:27 IST2021-04-05T04:27:02+5:302021-04-05T04:27:02+5:30

या कालावधीत सर्व बाजारापेठा, आठवडे बाजार व इतर दुकाने बंद राहतील. सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत दूध आणि ...

District Collector appeals to respond to public curfew from Thursday to Sunday | गुरूवार ते रविवार जनता कर्फ्यूला प्रतिसाद देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

गुरूवार ते रविवार जनता कर्फ्यूला प्रतिसाद देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

या कालावधीत सर्व बाजारापेठा, आठवडे बाजार व इतर दुकाने बंद राहतील. सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत दूध आणि वृत्तपत्र विक्रेत्यांना व्यवसाय करण्यास अनुमती राहील. वैद्यकीय सेवा आणि औषध विक्रीच्या आस्थापना, गॅस वितरण सुविधा पूर्णवेळ सुरू राहतील. जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करणाऱ्या वाहनांसाठी पेट्रोलपंप सुरू राहतील. अन्य वापरासाठी प्रतिबंध असेल. वैद्यकीय कारणास्तव नागरिकांना बाहेर पडण्याची मुभा असेल, मात्र त्यांच्यासोबत सबळ पुरावे असणे आवश्यक आहे.

आठवड्यातील सोमवार, मंगळवार व बुधवारी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, आस्थापना (किराणा दूध, फळे, भाजीपाला विक्री) पूर्वी दिलेल्या आदेशानुसार सकाळी ६ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा असेल. वैद्यकीय सेवा देणाऱ्या आस्थापना पूर्णवेळ सुरू राहतील. आरोग्य, महावितरण तसेच इतर अत्यावश्यक सेवा देणारी कार्यालये वगळता इतर सर्व शासकीय कार्यालये आणि बँक ५० टक्के कर्मचारी उपस्थितीत सुरू राहतील. शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम करण्यास प्रोत्साहन द्यावे. कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथ प्रतिबंधक कायदा १८९७, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३, भारतीय दंड संहिता १८६० मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: District Collector appeals to respond to public curfew from Thursday to Sunday