शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

दोडे गुजर समाजाच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा; तळोदा शहर कार्यकारिणी गठित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:28 IST

अध्यक्षस्थानी समस्त दोडेगुजर समाज पंचचे माजी विश्वस्त बन्सीलाल गोविंद पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून पंढरीनाथ चौधरी, मोहन ...

अध्यक्षस्थानी समस्त दोडेगुजर समाज पंचचे माजी विश्वस्त बन्सीलाल गोविंद पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून पंढरीनाथ चौधरी, मोहन पाटील आदी उपस्थित होते. बैठकीत समस्त दोडेगुजर समाज पंच नंदुरबार व तापी जिल्हा अध्यक्ष यशवंत शंकर पटेल यांच्या परवानगीने तळोदा शहर दोडेगुजर समाज संघटनेची नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तळोदा शहर दोडेगुजर समाज संघटनेच्या अध्यक्षपदी सर्वानुमते कांतीलाल तुमडू पाटील यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष योगेश उखा पाटील तर सचिव म्हणून सोमनाथ रमण पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीत कोषाध्यक्षपदी योगेश चव्हाण विश्वस्तपदी गोविंद पाटील, विकास पाटील, राजेंद्र चौधरी, पंकज पाटील, कांतीलाल पाटील, नंदकुमार पाटील, दीपक चौधरी, प्रदीप पाटील, सागर पाटील, भूषण मुकेश पाटील, राहुल पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे. कायदेशीर सल्लागारपदी ॲड.उदयसिंग भीमसिंग चौधरी यांची निवड करण्यात आली.

सूत्रसंचालन हितेंद्र पाटील तर आभार युवराज चव्हाण यांनी मानले. बैठकीसाठी गणेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, चंद्रकांत पाटील आदींनी परिश्रम घेतले. बैठकीत कोरोनाचे संक्रमण लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंगचे पालन ठेवण्यात आले होते.

मुलींच्या शिक्षणावर विशेष चर्चा

दोडे गुजर समाजाच्या तळोदा शहर कार्यकारिणीच्या निवडीसाठी घेण्यात आलेल्या बैठकीत शहरातील समाजबांधव उपस्थित होते. या वेळी समाजाच्या विकासासाठी सर्वानी संघटित राहण्याचा निर्णय घेतला. तसेच विविध विषयांसह सामाजिक प्रश्नांवरदेखील चर्चा करण्यात आली. सामाजिक रूढीपरंपरा- चालीरिती याबाबत भूमिका ठरविण्याचा व समाजाचा शैक्षणिक दर्जा वाढण्यासाठी नूतन कार्यकािरणीकडून प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. विशेषतः मुलींच्या शिक्षणाबाबत बैठकीत विशेष चर्चा करण्यात आली.