दिशा समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:28 IST2021-03-15T04:28:29+5:302021-03-15T04:28:29+5:30

डॉ. गावित म्हणाल्या, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील गाळ काढण्यासाठी मेरी मार्फत सर्वेक्षण करण्यात येऊन पावसाळा सुरू होण्यापूर्वी प्रकल्पातील गाळ काढण्यात ...

Discussion on various topics in the direction committee meeting | दिशा समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

दिशा समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

डॉ. गावित म्हणाल्या, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील गाळ काढण्यासाठी मेरी मार्फत सर्वेक्षण करण्यात येऊन पावसाळा सुरू होण्यापूर्वी प्रकल्पातील गाळ काढण्यात यावा, यामुळे सिंचनक्षेत्र वाढण्यास मदत होईल. स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत कामे उपलब्ध करून द्यावी. मुद्रा योजना, उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात यावा. नंदूरबार डाक विभागास मोक्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी, तसेच जिल्ह्यात सर्व केंद्र पुरस्कृत योजनेची कामे मार्चअखेर शंभर टक्के पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. बैठकीत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, रोजगार हमी योजना, सिंचन विभाग, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री जन-धन योजना, आदी योजनांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Discussion on various topics in the direction committee meeting