तळोदा पंचायत समितीच्या मासीक बैठकीत विविध विषयांवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 12:47 PM2020-05-27T12:47:16+5:302020-05-27T12:47:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा पंचायत समितीच्या मंगळवारी झालेल्या मासिक बैठकीत तालुक्यात सुरू असणाऱ्या विविध कामांचा आढावा घेण्यात ...

Discussion on various issues in the monthly meeting of Taloda Panchayat Samiti | तळोदा पंचायत समितीच्या मासीक बैठकीत विविध विषयांवर चर्चा

तळोदा पंचायत समितीच्या मासीक बैठकीत विविध विषयांवर चर्चा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : तळोदा पंचायत समितीच्या मंगळवारी झालेल्या मासिक बैठकीत तालुक्यात सुरू असणाऱ्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सभापती यशवंत ठाकरे होते.
बैठकीला गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, सहाय्यक गटविकास अधिकारी आर.बी. सोनवणे यांच्यासह पंचायत समिती सदस्य दाज्या पावरा, विजयसिंग राजपूत, पंचायत समिती सदस्य चंदनकुमार पवार, विक्रम रामलाल पाडवी, ईला अनिल पवार, सोनी रोहिदास पाडवी, सुमनबाई वळवी, बांधकाम उपअभियंता एस.व्ही. पवार, लघुसिंचन शाखा अभियंता पवार, ग्रामीण पाणी पुरवठा कनिष्ठ अभियंता राहुल गिरासे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर सामुद्रे, कर्मचारी आदी उपस्थित होते.
गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर यांनी शिक्षकांच्या कार्यरत व रिक्त पदांबाबत माहिती दिली. १५ जूनपासून शाळा उघडण्याची शक्यता लक्षात घेऊन शाळा पूर्व तयारी व इतर नियोजन संदर्भात करण्यात येत असणाºया उपाययोजनाची माहिती दिली. बांधकाम विभाग उपअभियंता एस.व्ही. पवार यांनी तालुक्यात चाललेल्या विविध बांधकामाबद्दल सविस्तर माहिती दिली. लघुसिंचन शाखा अभियंता पवार यांनी तालुक्यातील विविध गावातील बंधाºयाच्या सद्य:स्थितीबाबत माहिती दिली. ग्रामीण पाणीपुरवठ्याचे राहूल गिरासे यांनी तालुक्यातील गावात पाण्याची परिस्थिती काय आहे व यावर्षी पाण्याचे काय नियोजन करावे लागेल याविषयी माहिती दिली.
पशुसंवर्धन अधिकारी डॉ.किशोर सामुद्रे यांनी पशुसंवर्धन विभागाकडून आगामी पावसाळ्याच्या अनुषंगाने करावयाचा कामांची बैठकीत माहिती दिली व पशुपालकांना औषधी वाटप करण्यात आल्याचे सांगितले. पावसाळ्यामध्ये साथीचे आजार पसरू नये यासाठीदेखील लसी देण्यात आल्या आहेत. यांसह सर्वच विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी महिन्याभराचा आढावा या बैठकीत मांडला.

सभापती यशवंत ठाकरे यांनी बालविकास प्रकल्पांतर्गत येणाºया महिला लाभार्थ्यांमध्ये गरोदर माता व स्तनदा मातांना अंगणवाडी सेविकांमार्फत देण्यात येणाºया पोषण आहारातील अनियमिततेच्या बाबतीत तीव्र नाराजी व्यक्त केली. अनेक लाभार्थ्यांना अद्याप लाभ मिळाला नसल्याचे तसेच काही ठिकाणी लाभार्थ्यांना अपुºया प्रमाणात साहित्य मिळत असल्याच्या तक्रारी असल्याचे त्यांनी सांगितले. या संबधी त्यांनी संबंधित विभागाला यापुढे लाभार्थ्यांच्या तक्रारी येऊ न देण्याच्या सूचना दिल्या.

Web Title: Discussion on various issues in the monthly meeting of Taloda Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.