शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक व कायदा व्यवस्थापनात कोरोनामुळे होणाऱ्या बदलांवर विधी महाविद्यालयात चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:23 IST

नंदुरबार- कोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग केेले गेले. त्याचा चांगला-वाईट परिणाम येत्या काळात दिसून येतील. त्यासाठी आपणही आगामी बदलांना ...

नंदुरबार- कोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग केेले गेले. त्याचा चांगला-वाईट परिणाम येत्या काळात दिसून येतील. त्यासाठी आपणही आगामी बदलांना तयार असले पाहिजे असा सूर ‘कोरोना महामारीचा शैक्षणिक व कायदा व्यवस्थापन परिणाम’ या विषयावरील चर्चासत्रात उमटला. विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘कोविड-१९ या महामारीचा शैक्षणिक व कायदा व्यवस्थापन पद्धतीवरील परिणाम’ या विषयावर ऑनलाइन चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.डी. चौधरी होते. प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा.डॉ.एम.एस. रघुवंशी होते. डॉ.एन.डी. चौधरी व प्रा.डॉ.एम.एस. रघुवंशी यांनी कोविड-१९ या महामारीमुळे शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन प्रयोग करण्याच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात बदल होऊन हे बदल भविष्यात मोठे परिणाम करणारे आहेत. बदल हे विशेषतः विज्ञान क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम करणारे असल्याचे मत व्यक्त केले. चर्चासत्रात महाविद्यालयाच्या बहुतांश विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने सहभाग नोंदवला. आचल रघुवंशी, शमीम पठाण, हर्षल पाटील, प्रीतम निकम, रूपाली कोळी, नरेंद्र हिरणवाला, विनीत बडगुजर, किर्तेश जगताप, कांचन पाटील, दीपक अहिरे, काजल अग्रवाल, देवयानी शेवाळे, अंतिमा राजभर यांनी कोरोनामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेले सकारात्मक व नकारात्मक बदल व त्याचा भविष्यात वकिली व्यवसायावर होणारा परिणाम यावर मत मांडले. चर्चासत्र आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष मनोज रघुवंशी, उपाध्यक्ष ॲड. राजेंद्र रघुवंशी यांनी प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी कार्यक्रम भविष्यात राबवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. ललित सूर्यवंशी यांनी आभार मानले.