नटावदच्या ‘त्या’ बाधिताचा रिपोर्ट येण्याआधीच डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 12:30 IST2020-05-04T12:28:50+5:302020-05-04T12:30:27+5:30

नंदुरबार : तालुक्यातील नटावद येथील कोरोनाबाधित रुग्णाचा अहवाल येण्यापूर्वीच त्याला डिस्चार्ज दिल्याचा प्रकार समोर आला आहे़ रविवारी अहवाल मिळाल्यानंतर ...

Discharge before the report of Natavad's 'that' infection | नटावदच्या ‘त्या’ बाधिताचा रिपोर्ट येण्याआधीच डिस्चार्ज

नटावदच्या ‘त्या’ बाधिताचा रिपोर्ट येण्याआधीच डिस्चार्ज

नंदुरबार : तालुक्यातील नटावद येथील कोरोनाबाधित रुग्णाचा अहवाल येण्यापूर्वीच त्याला डिस्चार्ज दिल्याचा प्रकार समोर आला आहे़ रविवारी अहवाल मिळाल्यानंतर त्याला आरोग्य पथकाने शोधाशोध करुन रात्री उशिरा आयसोलेशनमध्ये दाखल केले आहे़
नंदुरबार शहरातील कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याने ३१ वर्षीय युवकास २६ एप्रिलपर्यंत सिव्हीलच्या आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले होते़ येथून त्याची रवानगी होळ तर्फे हवेली येथील क्वारंटाईन कक्षात करण्यात आली होती़ त्याच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे़ दरम्यान रविवारी ३ मे रोजी सकाळी त्याला सोडून देण्यात आल्याची माहिती आहे़ येथून तो नंदुरबार शहरातील आपल्या घरी गेला होता़ तर तेथून नटावद ता़ नंदुरबार येथे पत्नीला भेटण्यासाठी गेला़ सायंकाळी त्याचा अहवाल मिळाल्यानंतर आरोग्य विभाग व महसूल विभागाची एकच धावपळ उडाली होती़ त्याला रात्री नटावद येथून पथकाने ताब्यात घेत सिव्हीलमध्ये आणले होते़


लक्षणेच दिसत नसल्याचा दावा

 नंदुरबार शहरातील प्रथम कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या ३१ वर्षीय युवकात तब्बल २४ दिवस होऊनही कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आली नसल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे़
त्याच्या संपर्कात आलेली पत्नी, मुलगी आणि आई यांचे स्वॅब नमुने आरोग्य विभागाने घेतले आहेत़ तर संपर्कात आलेल्या आठ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे़ त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु आहे़
नटावद येथील संबधिताच्या घरासह परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे़ त्यानुसार कारवाई सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे़ दरम्यान अद्यापही त्याच्या लक्षणे दिसत नसल्याचे सांगण्यात आले आहे़

Web Title: Discharge before the report of Natavad's 'that' infection