शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदी काळात आधारकार्ड जवळ नसल्यास थेट कारवाई- जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:32 IST

घराबाहेर पडलेल्या, रस्त्यावरून चालणाऱ्या किंवा मोटरसायकल, वाहने, तीनचाकी, चारचाकी इत्यादी चालवत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपले नाक व तोंडावर व्यवस्थितपणे ...

घराबाहेर पडलेल्या, रस्त्यावरून चालणाऱ्या किंवा मोटरसायकल, वाहने, तीनचाकी, चारचाकी इत्यादी चालवत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपले नाक व तोंडावर व्यवस्थितपणे झाकलेले मुखवटे घालावेत. हनुवटीच्या खाली मास्क घालणे किंवा नाक आणि तोंड दोन्ही उघडे ठेवणेदेखील गुन्हा आहे. मुखवट्याचा शास्त्रीय पद्धतीने वापर न करणारे व्यक्ती व्हायरसचे सुपर फैलाव करणारे असतात. अशा व्यक्तींच्या विरोधात कायद्यात तरतूद केल्याप्रमाणे गुन्हा नोंदविला जाईल.

कोणतीही व्यक्ती, लोकप्रतिनिधी असेल किंवा कोणत्याही राजकीय पक्षांचे पदाधिकारी, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत इ. सदस्यांना अशा निर्बंधातून मुभा नसेल. स्वत:ला किंवा कोणत्याही उल्लंघनकर्त्याला अशा निर्बंधांचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यापासून वाचविण्यासाठी संबंधित अंमलबजावणी यंत्रणेवर कोणताही दबाव किंवा प्रभाव टाकू नये. अशा प्रकारचे कृत्य केल्यास संबंधित व्यक्ती अथवा लोकप्रतिनिधीवर लोकसेवकाद्वारे कर्तव्य बजावताना हस्तक्षेप केल्याबद्दल दंडनीय गुन्हा दाखल करण्यात येईल. वरीलप्रमाणे दिशानिर्देश आणि सर्व निर्बंध हे कर्तव्यावर नसलेल्या सर्व लोकसेवकांनाही लागू राहतील.

या आदेशाचे कोणत्याही व्यक्ती, समूह, संस्था अथवा संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथ प्रतिबंधक कायदा, फौजदारी प्रक्रिया संहिता, तसेच भारतीय दंड संहितेच्या कलमा नुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.