आरोग्य विभागाच्या माहितीत रूग्ण संख्येत तफावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 11:55 IST2020-05-05T11:55:45+5:302020-05-05T11:55:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे शासनाकडे पाठविण्यात येणाऱ्या रूग्ण संख्येच्या माहितीत मोठी ...

Differences in patient numbers in health department information | आरोग्य विभागाच्या माहितीत रूग्ण संख्येत तफावत

आरोग्य विभागाच्या माहितीत रूग्ण संख्येत तफावत

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे शासनाकडे पाठविण्यात येणाऱ्या रूग्ण संख्येच्या माहितीत मोठी तफावत असल्याचे चित्र आहे. नंदुरबार जिल्ह्यात रूग्णांची संख्या १९ असतांना केवळ १२ असल्याची माहिती त्यात दिसून येते.
नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे एकूण १९ रूग्ण आढळले असून, त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे व जिल्हा शल्यचिकित्सकांतर्फे नियमित सुधारित अपडेट व बिनचूक दिली जाते. परंतु जिल्हा प्रशासनाचे हे अहवाल असतांना शासनाच्या माहितीत मात्र रूग्ण संख्या कमी असल्याचे येत आहे. ज्या वेळी जिल्ह्यातील रूग्ण संख्या १७ होती त्या वेळी शासनाच्या २७ एप्रिलच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पत्रात ही माहिती ११ रूग्ण व एकाचा मृत्यू दाखविण्यात आली. त्यानंतर रूग्णसंख्या जेव्हा १८ झाली तेव्हा शासनाच्या या पत्रात रूग्णांची संख्या १२ दाखविण्यात आली.
एकूणच रूग्णांची संख्या राज्य व केंद्र शासनाच्या माहितीत कमी येत असल्याने जिल्ह्यात तो चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान धुळे येथील प्रयोगशाळेतून माहिती अपडेट केली जात नसल्याने ही तफावत निर्माण झाल्याचे दिसून येते.

जिल्हा प्रशासनातर्फे रोजच्या रोज अहवाल येताच माहिती अपडेट करून ती पाठविली जाते. त्यात सर्व माहिती अपडेट करून रोज दिवसभरातून अहवाल येताच वेळोवेळी ती पाठविली जाते. राज्य शासनाकडे मात्र धुळे येथे ज्या ठिकाणी अहवाल तपासले जातात त्या प्रयोग शाळेकडून पाठविले जाते. तेथून माहिती अपडेट होत नसल्याने ही तफावत दिसून येते.
-डॉ.राजेंद्र भारूड, जिल्हाधिकारी, नंदुरबार

Web Title: Differences in patient numbers in health department information