शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

शाळाबाह्य बालके शोध मोहिमेसाठी व्यापक जनप्रबोधनासाठी डायटतर्फे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:28 IST

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या समता विभागाकडून याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या २३ फेब्रुवारीच्या शासन ...

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या समता विभागाकडून याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या २३ फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार आपल्या जिल्ह्यामध्ये शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांची शोध मोहीम १ ते १० मार्च या दरम्यान सुरू आहे. सदर शोध मोहीम ही जिल्ह्यातील तीन ते १८ वयोगटातील मुलांसाठी असून, यामध्ये जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणेचा सहभाग आहे. याबाबत व्यापक जनप्रबोधन होण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार यांनीदेखील आवाहन केले आहे. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था नंदुरबारच्या समता विभाग विभागामार्फत सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. या शोधमोहिमेबाबत व्यापक जनप्रबोधन होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकारी व सदस्य, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी व सदस्य, स्वयंसेवी संस्था, स्थानिक कलाकार यांनी आपल्या कार्यक्षेत्रात शोध मोहिमेचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार होण्याच्या दृष्टीने सर्व जनतेस व संबंधित घटकांना मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रेरणात्मक आवाहन करावे व शाळाबाह्य बालके शोध मोहिमेत सहभागी व्हावे, अशी विनंती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नंदुरबारचे प्राचार्य जे. ओ. भटकर यांनी केली आहे. या माध्यमातून शोध मोहिमेबाबत व्यापक जनप्रबोधन होऊन सर्व बालकांना मोफ़त व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क मिळवून देता येईल, असेही या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.