शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधितांना मधुमेह अन् रक्तदाब नेतोय मृत्यूच्या दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:38 IST

नंदुरबार : जिल्ह्यात एकूण ५६६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे संक्रमण शरीरात अधिक तीव्रतेने होऊन व्याधी बळावल्याने हे मृत्यू ...

नंदुरबार : जिल्ह्यात एकूण ५६६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे संक्रमण शरीरात अधिक तीव्रतेने होऊन व्याधी बळावल्याने हे मृत्यू झाले असले तरी याला रक्तदाब व मधुमेहासारखे आजार सहाय्यकारी ठरल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे दुर्धर आजार असलेल्यांनी अधिक काळजी घेण्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांत जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या दुपटीने वाढली आहे. फेब्रुवारी महिन्यात नियंत्रणात असलेला कोरोना अचानक वाढीस लागल्याने पाच मार्चनंतर मृत्यूंची संख्या वाढीस लागली होती. यातून दर दिवशी पाचपेक्षा अधिक मृत्यू होत असल्याचे दिसून येत होते. यात वृद्धांचे मृत्यू होण्याचे प्रमाण हे अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, या मृत्यूत मधुमेह, रक्तदाब, हायपर टेन्शन यासह दुर्धर व दीर्घ आजार असलेल्यांचे प्रमाण अधिक असल्याचे सांगण्यात येत होते. आधीच व्याधी असताना काळजी न घेतल्याने कोरोनाचा विषाणू फुफ्फुसामध्ये वाढीस लागल्याने मृत्यू ओढावल्याचे जिल्हा रुग्णालयाकडून करण्यात आलेल्या डेथ ऑडिटमध्ये समोर आले आहे. वेळाेवेळी रुग्णांच्या प्रकृतीचा आढावा घेत मृत्यूची कारणे समोर आणण्याचा प्रयत्न जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. यातून दुर्धर आजार असलेल्यांना बाधा झाल्यानंतर सातत्याने मार्गदर्शन करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले आहे.

अतिजाेखमीच्या व्यक्तींनी काळजी घेण्याची गरज

दरम्यान, कोरोनाचा संसर्ग होऊ शकणाऱ्या मधुमेह, रक्तदाब, हायपर टेन्शन, हृरदयरोगी, दुर्धर आजारी, कॅन्सरग्रस्त, एचआयव्ही बाधित, टीबीग्रस्त रुग्णांसाठी आरोग्य प्रशासनाने काळजी कशी घ्यावी याबाबत सूचना केल्या आहेत. या रुग्णांनी बाधा होण्याची शक्यता असल्याने कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करून दैनंदिन कामकाज करावे, असे सांगण्यात आले आहे. विविध आजारांवर उपचार घेत असतानाही काळजी घेत, सातत्याने वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेत औषधी घ्याव्यात, अशाही सूचना करण्यात आल्या आहेत.

जिल्हा रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची मेडिकल हिस्ट्री माहिती करून घेत उपचार केले जात आहेत. रुग्णाला योग्य ते मार्गदर्शन करून समुपदेशनही करण्यात येत आहे. आजार बळावू नये यासाठी प्रयत्न आहे.

-डाॅ. के. डी. सातपुते, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, नंदुरबार.