शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर सुरू झालेला हिंसाचार थांबेना, जमावाने लेलिनचा पुतळा तोडला, भाजपावर आरोप
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
5
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
6
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
7
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
8
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
9
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
10
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
12
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
13
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
14
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
15
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
17
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
18
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींमध्ये जागृतीमुळे धडगाव कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 12:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : धडगाव तालुका अतिदुर्गम व आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. १६२ गावे व ५४० पेक्षा ...

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : धडगाव तालुका अतिदुर्गम व आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. १६२ गावे व ५४० पेक्षा जास्त पाडे असलेल्या तालुक्यातील धडगाव ही एकमेव बाजारपेठ असल्यामुळे याठिकाणी होणारी गर्दी रोखण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. नर्मदा काठावर तालुकाला वसला असून, या तालुक्याला लागूनच मध्य प्रदेशची सिमा आहे. नर्मदेतून बोटीद्वारे धडगावात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांकडे पोलीस व प्रशासनासह आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे.तालुक्यात इतर राज्य व जिल्ह्यातून आलेल्या नऊ हजार ४८५ लोकांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना होमक्वॉरंटाईन करण्यात आले. तालुक्यातील १३ प्राथमिक आरोग्य केंद्रात होमक्वॉरंटाईन पथक तयार करून या सर्वांची सलग १४ दिवस तपासणी करून आशा वर्कर व आरोग्य कर्मचाऱ्यांतर्फे पाठपुरावा करण्यात येतो. अद्यापपर्यंत तालुक्यातील सात संशयित रूग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले असता सर्वांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.तालुक्यांतर्गत एकूण सहा ठिकाणी चेकपोस्ट तैनात करण्यात आले आहेत. याकडे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, पोलीस व स्थानिक पातळीवरील ग्रामसुरक्षा दलाचे कर्मचारी लक्ष देवून आहेत.शासकीय आश्रमशाळा मांडवी येथे कोविड केंद्र स्थापन करण्यात आले आहे. तेथील रूग्णाना दोन वेळेचे जेवण देण्यात येते. तसेच ग्रामीण रूग्णालय धडगाव येथे समर्पित कोवीड आरोग्य केंद्र तयार करण्यात आले आहे. दोन्ही ठिकाणी २४ तास वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी हजर आहे. इथे दाखल असलेल्या सर्व लोकांची दररोज काळजीपूर्वक आरोग्य तपासणी करण्यात येते. याठिकाणी २४ तास १०८ रूग्णवाहिका व त्यावरील डॉक्टर उपस्थित आहेत. याठिकाणी तपासणी केंद्र सुरू आहे.यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दिनेश बडे यांना स्थानिक प्रशासन, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे, पोलीस निरीक्षक डी.एस. गवळी, जिल्हा परिषद सदस्य विजयसिंग पराडके, माजी जिल्हा परिषद सदस्य हारसिंग पावरा, धनसिंग पावरा यांच्यासह प्रत्येक गावाचा पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते काकडदा व बिजरी येथील ग्रामरक्षक दलाचे मोलाचे सहकार्य लाभले. या सर्वाच्या सहकार्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण झाल्याने हे शक्य झाले.

धडगाव तालुक्यात कोरोनाचा शिरकाव होऊ शकला नसल्याने ही बाब नक्कीच आनंदाची आहे. परंतु कोरोना विरूद्धची लढाई अजून संपलेली नाही. अजूनही बाहेरून बरेचसे मजूर, विद्यार्थी परत येत आहेत. या सर्वांवर आपल्याला काळजीपूर्वक लक्ष ठेवायचे आहे. आतापर्यंत आरोग्य विभागामार्फत बाहेरील राज्यातून व इतर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची तपासणी करून त्यांचावर १४ दिवस लक्ष ठेवले आहे. तालुक्यातील नागरिकांना स्वत:ची, परिवाराची व गावाची काळजी घेऊन आरोग्य विभागास सहकार्य करावे. तसेच सर्दी, ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे यापैकी कोणतेही लक्षण आढळल्यास त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. धडगाव तालुका यापुढेही कोरोना मुक्त राहील यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.-डॉ.दिनेश बडे, तालुका वैद्यकीय अधिकारी, धडगावशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केल्यामुळे व पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग यांच्या कामगिरीमुळे हे शक्य झाले.- ज्ञानेश्वर सपकाळे, तहसीलदार, धडगाव