शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात निवडणूकीच्या वादातून दोघांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 11:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकांनंतर आता वादांना तोंड फुटत असून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकांनंतर आता वादांना तोंड फुटत असून अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांना मारहाण करण्यात आली़ धडगाव तालुक्यात शनिवारी तर अक्कलकुवा तालुक्यात ८ रोजी मारहाणीचा प्रकार घडला होता़धडगावगौऱ्याचा पाटीलपाडा ता़धडगाव येथील कुवरसिंग मारग्या पराडके या युवकाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत मदत केली नाही, यावरुन शिवाजी होमा पराडके याच्यासोबत वाद झाला होता़ शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास कुवरसिंग हा घराकडे जात असताना तळोदा-धडगाव रस्त्यावर पालखा गावाजवळील पुलावर शिवाजी पराडके याने थांबवून पुन्हा वाद घातला होता़ यातून शिवाजी पराडके याच्यासह काकड्या वेस्ता पराडके, दिलीप काकड्या पराडके, मोहन ऊर्फ मोवाशा पराडके, दिगंबर ऊर्फ सुंड्या पराडके सर्व रा़ गौºयाचा कारभारीपाडा यांनी कुवरसिंग पराडके यांना डेंगाºयाने मारहाण करत शिवीगाळ केली़ दरम्यान कुवरसिंग हा गौºयाचा पाटीलपाडा येथील घरी गेल्यानंतरही सर्व पाच संशयितांनी पुन्हा वाद घातला होता़ यावेळी त्याची आई व चुलत भाऊ हे भांडण सोडवण्यासाठी आले असता, त्यांनाही मारहाण करण्यात आली़याप्रकरणी कुवरसिंग याने दिलेल्या फिर्यादीवरुन सर्व पाच संशयितांविरोधात धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली़ त्यांच्यावर रविवारी न्यायालयीन कारवाई झाल्याची माहिती आहे़ यातील संशयित शिवाजी पराडके राष्ट्रीय पक्षाचा पदाधिकारी आहे़अक्कलकुवातालुक्यातील ओघाणीचा चापडीपाडा येथील मगन मुवाश्या वसावे याची पत्नी निवडणूकीत उमेदवारी करत होती़ तिला मतदान केले नाही यावरुन मगन वसावे याने मोग्या दमण्या वसावे रा़ ओघाणीचा ्नचापडीपाडा याला आठ जानेवारी रोजी मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर घरात घुसून मारहाण केली होती़ डेंगाºयाने मारहाणीत मोग्या वसावे हा जखमी झाला होता़उपचार पूर्ण झाल्यानंतर शनिवारी मोलगी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन मगन वसावे व प्रताप वसावे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवदास पाडवी करत आहेत़