शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

‘फाग’च्या रक्कमेतून गाव निर्जंतुकीकरणाचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा तालुक्यातील धवळीविहीर येथील तरुणांनी होलिकोत्सवात ‘फाग’ मागून जमवलेल्या रकमेतून संपूर्ण गाव निर्जंतुकीकरण करण्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : तळोदा तालुक्यातील धवळीविहीर येथील तरुणांनी होलिकोत्सवात ‘फाग’ मागून जमवलेल्या रकमेतून संपूर्ण गाव निर्जंतुकीकरण करण्याचा निर्धार केला आहे. या रकमेतून त्यांनी गावातील प्रत्येक कुटुंबाला निर्जंतुकीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या द्रावणाचे वाटप करून त्याचा वापर करण्याचे प्रशिक्षण दिले आहे.आदिवासी बांधवांच्या जीवनात होळी सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सातपुड्यात तर संपूर्ण एक आठवडा होलिकोत्सव साजरा केला जातो. होलिकोत्सवादरम्यान फाग म्हणजे देणगी मागण्याची प्रथा आजही प्रचलित आहे. होलिकोत्सवात अनेक जण आपला नवस फेडण्यासाठी होळीनंतरचे पाच दिवस विविध रूप धारण करून पंचक्रोशीतील गावात जाऊन होळीनृत्य सादर करतात. होळी नृत्य सादर करणाºया समूहाला गावातील नागरिक रोख रक्कम व धान्याच्या स्वरूपात देणगी देतात त्याला फाग म्हटले जाते. तळोदा तालुक्यातील धवळीविहीर येथील होळी नृत्य सादर करणाºया युवकांच्या ग्रुपने होलिकोत्सवात फाग मागून १५ हजार रुपयांची रोख रक्कम जमवली होती. होलिकोत्सवानंतर लगेच देशात कोरोनाचा फैलाव झाल्याने लॉकडाऊन लागू करण्यात आले. त्यामुळे या तरुणांकडे ती रक्कम तशीच राहिली. कोरोणाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळोवेळी आपले हात, सभोवतच्या वस्तू व परिसर निर्जंतुकीकरण करणे आवश्यक असते. धवळीविहीर हे गाव शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती असणारे गाव असून अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह हा शेतमजुरीवर आहे.त्यामुळे त्यांना सातत्याने आपला परिसर व वापरातील वस्तू निर्जंतुकीकरण करत राहण्यासाठी बाजारातील महागडे सॅनेटाईझर व अन्य वस्तू घेणे परवडणारे नाही. म्हणून होलिकोत्सवात फाग मागून जमवलेली रक्कम अशा कुटुंबांना आपला परिसर व घरातील विविध वस्तू निर्जंतूक करता यावे यासाठी वापराचे या युवकांनी ठरवले. त्यानुसार त्यांनी सरपंच व पंच मंडळीशी चर्चा करून टीसीएल पावडर खरेदी करून सोडीयम हायपोक्लोराईडचे द्रावण तयार केले. ते द्रावण बाटल्यांमध्ये भरून गावात कुटुंबांना वाटप केले. शिवाय ते द्रावणाचा परिसर व वस्तू निजंर्तुकीकरण कसा करावा याची माहिती व प्रशिक्षणही या युवकांनी दिली. गावात या द्रावणाची फवारणी करून गावात ठिकठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात आले. यासाठी त्यांना तीन ते चार हजार रुपयांचा खर्च आला. या रक्कमेतून पुढील महिनाभर हा उपक्रम राबविला जाणार असून प्रत्येक आठवड्याला गावाचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.होलिकोत्सवात फाग मागणाºयामध्ये सुनील परमार, प्रकाश पटले, हिरालाल नावडे, दिनेश पावरा, वसंत पावरा, कपिल परमार, चेतन पावरा, दिनेश रावताळे, विक्रम पावरा, भाईदास परमार, नटवर परमार, जितेंद्र पावरा, भोसला पावरा, जयसिंग महाराज, डोंगरसिंग पटले, गोरख परमार, अर्जुन पुजारा, प्रताप बाबा पुजारा, जामसिंग पावरा, गोविंद परमार, सुनील पाडवी, ईश्वर पाडवी यांचा सहभाग होता. धवळीविहीरचे सरपंच दारासिंग पावरा यांच्या सहकार्याने गावात हा उपक्रम राबविण्यात आला.वैश्विक महामारी कोरोनाला दूर ठेवण्यासाठी हे सॅनिटायझर कसे वापरावे याची माहिती व प्रशिक्षण ग्रामस्थांना देण्यात आले आहे. खेड्यापाड्यात असे स्वयंसेवी युवक स्वयंस्फूर्तीने काम करीत आहेत ही आनंदाची बाब आहे. प्रत्येक गावातील तरुणांनी जबाबदारी घेतली तर देशातून कोरोनाचा प्रादुर्भाव आपण रोखू शकतो.-हेमंत ठाकरे, विज्ञान शिक्षक, धवळीविहीरफाग मागून लोकवर्गणीतून जमा झालेली रक्कम ही विधायक कामासाठी वापरली जावी असा आमचा हेतू होता. त्यामुळे आम्ही तरुणांनी एकत्र येत गाव सुरक्षित राहण्यासाठी गाव निर्जंतुक ठेवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविला.-भाईदास परमार, धवळीविहीर.