शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यावधी रूपये खर्च करूनही खुर्चीमाळ ओरपा रस्ता निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 13:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर ‌: अक्कलकुवा तालुक्यातील नवलपूर, सोजडबारपाडा, माळ, खुर्चीमाळ, ओरपा या घाट सेक्शनच्या रस्त्यावर कोट्यावधी रुपये खर्च ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर ‌: अक्कलकुवा तालुक्यातील नवलपूर, सोजडबारपाडा, माळ, खुर्चीमाळ, ओरपा या घाट सेक्शनच्या रस्त्यावर कोट्यावधी रुपये खर्च करून ही या खुर्चीमाळ ओरपा घाट सेक्शनचा रस्त्यावरील मोठमोठे दगड गोटे पडून आहेत. या रस्त्यावर फोरव्हीलर तर दूरच साधी मोटारसायकलही निघू शकत नसल्याने या सातपुड्याच्या डोंगर माथ्यावरील नागरिकांना खडतर रस्त्यावरून मोटारसायकल उचलून पायपीट करीत मार्ग काढावा लागतो. दरम्यान, मोटारसायकलस्वार खुर्चीमाळ व माळ ओरपा दरम्यानच्या उडाणबारा ते बालेखाच्यापाडा या दोन किलोमीटर रस्त्यावरील दगड- गोटे बाजूला करीत मार्ग काढत पाटबारा येथील अंत्यविधीच्या कार्यक्रमाला चार तासांच्या परिश्रमानंतर पोहचतात. पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत २०१३ मध्ये मंजूर झालेला नवलपूर खुर्चीमाळ, ओरपा या घाट सेक्शन रस्त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करूनही हा रस्ता आहे तसाच आहे. नेदवान खुर्चीमाळ, माळ ओरपा दरम्यानच्या घाट सेक्शन रस्त्यावर पावसाळ्यात दरड व मातीचा मलबा कोसळून रस्ता बंद पडला असताना संबंधित विभागाकडून किंवा ठेकेदाराकडून साधी दखल घेतली जात नसल्याने गेल्या दोन वर्षांपूर्वी भाजप प्रदेश सदस्य नागेश पाडवी यांनी जेसीबीने स्वत: उभे राहून दरड व मातीचा मलबा साफ करून रस्ता साफ केला होता. परंतु त्यानंतर या खुर्चीमाळ ओरपा या घाट सेक्शन रस्त्यावर पावसाळ्यात दरड मातीच्या मलबा पडून आहे.दरम्यान पाटबारा येथील जिल्हा परिषद सदस्यांच्या येथे अंत्यविधीच्या कार्यासाठी निघालेले पोलीस पाटील लक्ष्मण नाईक खुर्चीमाळ,  पुन्या वसावे डोगरीपाडा, बाज्या वसावे, जयसिग नाईक उम्रपाणीपाडा, ईश्वर वसावे डोगरीपाडा, सायसिग वसावे, शंकर खाल्या वसावे उपसरपंच उमरागव्हाण, मंगलसिग वसावे ओरपा, नानसिग नाईक, मंगलसिग नाईक खुर्चीमाळ यांना दोन किलोमीटरच्या रस्तावरील दगड गोटे स्वता बाजूला करून पाटबारा येथील अंत्यविधीला चार तासांनंतर पोहोचावे लागले.  खुर्चीमाळ व माळ ओरपा रस्त्यावरील नेदवानच्या खडच्यापाडा, आबारीपाडा, खडकीपाडा, माळ डोगरीपाडा उमराईपाडा कुंभवीपाडा येथील नागरीकांना दोन ते अडीच किलोमीटर खडतर पायवाटेने माळ ओरपाच्या मुख्य रस्त्यापर्यंत पर्यंत जावे लागत असते.