शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात ‘चटकदार’ मका कणसांना मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:21 IST

पावसाळा सुरू होताच शहरात मक्याच्या कणसांची आवक वाढते. हिरवट-पिवळी सालं असलेले मक्याचे कणीस अनेकांचे लक्ष वेधून घेते. धो-धो कोसळणाऱ्या ...

पावसाळा सुरू होताच शहरात मक्याच्या कणसांची आवक वाढते. हिरवट-पिवळी सालं असलेले मक्याचे कणीस अनेकांचे लक्ष वेधून घेते. धो-धो कोसळणाऱ्या पावसात पर्यटनस्थळांबरोबरच घरामध्ये लिंबू, मीठ, तिखट लावून भाजलेलं कणीस खाणं, हा अनेकांच्या आवडीचा कार्यक्रम असतो. नंदुरबार तालुक्यातही मक्याच्या कणसांना मागणी वाढली आहे. बाजारपेठेसह, मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवरही त्यांची विक्री केली जात आहे.

पावसाळ्यात सातपुड्यातील निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी परजिल्ह्यातील असंख्य पर्यटक तालुक्यात येतात. तोरणमाळ येथील धबधबा स्थानिकांसह पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. दाट धुक्यामुळे सात पायरी घाटातील विलोभनीय दृश्य मन मोहून टाकते. याशिवाय अजूनही अनेक पर्यटनस्थळे आहेत, जिथे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. या पर्यटकांसाठीही भाजलेले कणीस आकर्षण ठरते. स्थानिक छोटे व्यावसायिक या कणीस विक्रीतून आपला संसार चालवतात. तालुक्यात कोरोनाचा संसर्ग अजूनही कमी झालेला नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार गर्दी जमणारे धबधबे व पर्यटनस्थळे बंद करण्यात आली आहेत. त्याचा फटका कणीस विक्रीलाही बसला आहे. काही तरुण तसेच छोटे व्यावसायिक नंदुरबार जिल्‍ह्यातील बाजारपेठेसह विविध ठिकाणी मक्याच्या कणसांची विक्री करत आहेत. कच्ची कणसे ५० रुपयाला डझन, एक तर भाजलेले कणीस वीस रुपयांना एक असे विकले जात आहे.