शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

नवापूरच्या वंचित लाभाथ्र्याना घरकुल देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 11:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : पंतप्रधान आवास योजनेच्या व्हर्टिकल तीन योजनेतील 622 वंचित लाभाथ्र्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : पंतप्रधान आवास योजनेच्या व्हर्टिकल तीन योजनेतील 622 वंचित लाभाथ्र्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, तसेच नवापूर नगरपालिकेतर्फे घरांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. माजी तालुकाप्रमुख गणेश वडनेरे यांनी केली आहे. त्यांनी तहसीलदार सुनीता ज:हाड यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत व्हर्टिकल तीन या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी नवापूर शहरातून जवळपास 622 बेघर कुटुंबांनी 2016 पासून अर्ज केले आहे. शहरातून वाहणा:या रंगावली नदीला 17 ऑगस्ट 2018 रोजी आलेल्या महापुरामुळे नदीकाठी राहणा:या अनेकांचे नुकसान झाले होते. शहरातील बेलदारवाडा, ताईवाडा, जुने महादेव मंदिर परिसर, भगतवाडी, राजीवनगर, ईदगाह रोड, फुलफळी, जुनी पोस्ट गल्ली भागातील रहिवासीयांना सर्वाधिक फटका बसला होता. तत्कालीन जिल्हाधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी यांनी नुकसानची पाहणी करून पूरग्रस्त भागातील बाधितांना पंतप्रधान आवास योजनेत घरकुल देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश नगरपालिकेला दिले होते. तसेच 27 ऑगस्ट 2018 रोजी तत्कालीन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी पूरग्रस्तांना घरकुल देण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. हा प्रश्न तातडीने सोडवत पात्र लाभाथ्र्यांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा गणेश वडनेरे, दिनेश भोई, किसन शिरसाठ, हार्दिक माळी आदींनी दिला आहे.