शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीतील नुकसानधारक शेतकऱ्यांना मदतीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 11:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई व पीक विम्याच्या भरपाईची रक्कम ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई व पीक विम्याच्या भरपाईची रक्कम देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील अल्पभुधारक शेतकरी अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे उन्मळून पडला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत आर्थिक मंदिचे संकट उभे आहे. ज्याचे मुख्य कारण ग्रामीण भागातील लोकांची आर्थिक परिस्थिती आहे.गेल्या दोन-तीन वर्षांपासून राज्यात पडलेला सततच्या दुष्काळाने आणि आता अतिवृष्टीमुळे शेतकरी अधिक त्रस्त झालेला आहे. खर्च भागविण्यासाठी शेतकºयांची प्रचंड तारेवरची कसरत सुरू आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे चुकीचे पाऊल उचलतो. शिवसेना सत्तेत असतांना अथवा नसतानाही शेतकºयांच्या सोबत राहिली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने २५ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्रभर शेतकºयांना नुकसान भरपाई मिळावी, पीक विमा योजनेची रक्कम मिळावी या करीता भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणूक आचारसहिंता लागू असल्याने मोर्चा रद्द करून केवळ पदाधिकाºयांसह निवेदन देवून आमच्या भावना आपण राज्यपाल व शासनापर्यंत पोहोचवाव्यात.या वेळी शेतकºयांना पीक विम्याची रक्कम मिळावी व ज्यांना रक्कम मिळालेल्या आहेत अशा शेतकºयांच्या नावाच्या याद्या त्वरीत जाहीर कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.शहादा तालुक्यात ओला दुष्काळाने बाधीत झालेल्या शेतकºयांना राज्यपालांनी जाहीर केलेली शासकीय मदत त्वरीत खात्यात जमा करावी व मदत मिळालेल्या शेतकºयांच्या याद्या जाहीर कराव्यात. घर, शेती, जनावरे, विहीरी इत्यादींच्या नुकसानीची माहिती पंचनाम्यात समाविष्ठ करून भरपाई मिळावी. पीक कर्ज उद्दीष्ट पूर्ण झाले की, कसे याची खातर जमा करून कार्यवाही करावी. शासकीय योजनेप्रमाणे कर्ज मुक्तीत लाभ झालेल्या व प्रतिक्षा यादीवर असलेल्या शेतकºयांची यादी जाहीर करावी. तरी वरील बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शेतकºयांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्यात याव्यात अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली असून, या निवेदनावर तालुकाप्रमुख मधुकर रोहिदास मिस्तरी, शहर प्रमुख तुषार पाटील, भगवान टिला अलकरी, गणेश चित्रकथे, सुभाष पाटील, उत्तम पाटील, डॉ.सागर पाटील, रमेश कुवर, उद्धव पाटील, यांच्यासह शेतकरी, शेतमजूर, शिवसेना पदाधिकाºयांच्या स्वाक्षºया आहेत.