२३ महिन्यांचे स्थगित १० टक्के वेतन देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:21 IST2021-07-11T04:21:26+5:302021-07-11T04:21:26+5:30

या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही सर्व कर्मचारी आपण सांगितलेली स्वच्छता सर्वेक्षण, स्वच्छता मोहीम, माझे कुटुंब माझी जबाबदारी, मोबाईल ...

Demand for 10% salary deferred for 23 months | २३ महिन्यांचे स्थगित १० टक्के वेतन देण्याची मागणी

२३ महिन्यांचे स्थगित १० टक्के वेतन देण्याची मागणी

या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही सर्व कर्मचारी आपण सांगितलेली स्वच्छता सर्वेक्षण, स्वच्छता मोहीम, माझे कुटुंब माझी जबाबदारी, मोबाईल ॲप नोंदणी व कोविड-१९ ची कामे कामे प्रामाणिकपणे केली आहेत. तसेच आपणास १० टक्के वेतन मिळण्यासंदर्भात वेळोवेळी विनंतीदेखील केली आहे; परंतु आम्हास फक्त आश्वासन दिले जात आहे. त्यामुळे आपणास पुन्हा निवेदनाद्वारे विनंती करतो की, आम्हाला २३ महिन्यांचे स्थगित १० टक्के वेतन देऊन सहकार्य करावे. या निवेदनावर विभागीय राज्य उपाध्यक्ष करण चव्हाण, जिल्हाध्यक्ष-सचिव काझी मुदस्सीर, कार्याध्यक्ष संतोषकुमार सदाराव, ज्येष्ठ मार्गदर्शक उत्तम पावरा, खान्देश प्रमुख जमील मोमीन, माजी सचिव दासू कोकणी, कोषाध्यक्ष लीलेश गोसावी, सदस्य भरत पाटील, विभागीय सदस्य मयूर सूर्यवंशी, शिरीष पवार, पराग पाटील आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Demand for 10% salary deferred for 23 months