शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
5
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
8
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
10
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
11
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
12
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
15
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
16
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
17
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
18
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
19
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
20
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम सुरक्षा दलाच्या हाती गावांची रक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्याच्या सिमेवरील गावांमध्ये ग्राम सुरक्षा दल आणि त्या माध्यमातून पोलीस मित्र यांच्या वतीने  गावांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्याच्या सिमेवरील गावांमध्ये ग्राम सुरक्षा दल आणि त्या माध्यमातून पोलीस मित्र यांच्या वतीने  गावांच्या सिमा सील करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून बाहेरील कुठल्याही व्यक्तीला प्रवेश दिला जात नाही. तीन शिप्टमध्ये नेमून दिलेले रक्षक हे गावाच्या सिमेचे रक्षण करीत आहे. नंदुरबार जिल्ह्यालगत असलेल्या मध्य प्रदेशातील सेंधवा येथे तसेच मालेगाव आणि नाशिक येथे कोरोना संसर्गीत रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील सिमावर्ती गावांमध्ये विशेष दक्षता घेतली जात आहे. त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित  तसेच त्या त्या भागातील प्रांताधिकारी हे ग्रामसुरक्षा दल स्थापन करून त्यांना प्रोत्साहित करीत आहेत. दोन दिवसात 100 गावांमध्ये अशी दले स्थापन करून त्यांना कार्यान्वीत देखील करण्यात आले आहे. कोरोनाच्या पाश्र्वभुमीवर जिल्हा प्रशासन आणि पोलीस दल विविध पातळीवर सक्रीय आहे. सर्वच भागात पोहचण्यात प्रशासनाला मर्यादा असल्यामुळे आता गावातील युवकांची मदत घेवून त्यांना प्रशासनास सहकार्य करण्यासाठी पुढे आणले आहे. या करीता सरपंच, पोलीस पाटील यांच्या माध्यमातून युवकांची निवड करून त्यांना ग्राम सुरक्षा दलात निवड करण्यात आली आहे. प्रांताधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही दले स्थापन करण्यात येवून त्यांना स्थानिक पोलीस अधिका:यांकडून प्राथमिक स्तरावर प्रशिक्षीत करण्यात आले आहे. निवड केलेल्या युवकांवर  यापूर्वी कुठलेही गुन्हे दाखल नसावे ही प्रमुख अट आहे. त्यानुसार या युवकांची निवड करण्यात आली  आहे. 100 पेक्षा अधीक गावेनंदुरबार, शहादा, अक्कलकुवा व नवापूर हे तालुके मध्यप्रदेश व   गुजरात राज्याच्या सिमेवर आहेत. त्यामुळे आधी तालुक्यांच्या    सिमावर्ती भागातील गावांमध्ये ही दले स्थापन करण्यात आली आहेत. यात नंदुरबार तालुक्यातील 23 गावांचा समावेश आहे. शहादा तालुक्यातील 19, अक्कलकुवा तालुक्यातील 17 तर नवापूर तालुक्यात 40 गावांसह इतर तालुक्यात देखील दलांची स्थापना करून गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांमधील ग्राम सुरक्षा दले कार्यान्वीत देखील झाली आहेत. तीन शिफ्टमध्ये ते तैणात करण्यात आली आहेत. बॅरीकेडींग लावून सीलगावात येणा:या मुख्य रस्त्यांवर गावाच्या सिमेलगत बॅरीकेडींग लावण्यात आले आहे. या ठिकाणी ग्राम सुरक्षा दलातील सदस्यांना बसण्यासाठी सावलीची, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी प्रकाश व्यवस्था   राहावी यासाठी देखील सोय करण्यात आली आहे. काही गावात मोठे लाकडाची ओंडके किंवा काटेरी झाडांच्या फांद्या लावण्यात आल्या आहेत. गावात येणा:यांना अडविले जावून काही निरोप असल्यास दलातील सदस्यांमार्फत संबधितांर्पयत पोहचविला जात   आहे. परंतु बाहेरच्या व्यक्तीला    गावात प्रवेश दिला जात नसल्याचे चित्र आहे. विक्रेत्यांना देखील सर्व चौकशी करूनच आत सोडण्यात येत आहे. बहुतेक ठिकाणी विविध वस्तू विक्रेत्यांना गावाच्या बाहेरच थांबवून तेथेच खरेदीसाठी ग्रामस्थांना बोलविले जात आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होण्यास मदत होत आहे. जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील 9, शहादा तालुक्यात सहा, अक्कलकुवा तालुक्यातील पाच तर नवापूर तालुक्यातील चार रस्ते हे गुजरात व मध्यप्रदेश राज्यातून येतात. यापैकी चार रस्ते हे राज्यमार्ग, दोन रस्ते हे महामार्ग स्वरूपाचे तर इतर रस्ते हे जिल्हा मार्ग म्हणून आहेत. याशिवाय इतरही रस्ते हे कच्चे स्वरूपाचे आहेत. त्यामुळे या सर्व रस्त्यांवर नजर ठेवण्यासाठीची कसरत प्रशासनाची होत आहे. यापैकी मोजक्याच रस्त्यांवर तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. तर इतर रस्ते हे ग्राम सुरक्षा दलाच्या हवाली करण्यात आले आहेत. आता या दलावरच सर्व सुरक्षा राहणार आहे.