शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
3
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
4
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
5
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
6
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
7
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
8
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
9
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
10
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
11
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
12
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
14
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
15
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
17
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
18
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
19
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
20
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
Daily Top 2Weekly Top 5

परप्रांतीय येणाऱ्या मजुरांचा ओघ कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 12:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : परप्रांतीय मजुर, कामगार व त्यांच्या कुटुंबातील सुमारे २४ हजार लोकांना त्यांच्या राज्याच्या हद्दीपर्यंत पोहोचविण्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : परप्रांतीय मजुर, कामगार व त्यांच्या कुटुंबातील सुमारे २४ हजार लोकांना त्यांच्या राज्याच्या हद्दीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य पूर्ण झाले आहे. आता परप्रांतात जाणारे कुणीच येत नसल्याने आठवडाभर गजबजलेल्या सीमा परिवहन तपासणी नाक्याच्या परिसरात शुकशुकाट दिसून येत आहे. सीमेवर वाहनांची तपासणी आता सख्त करण्यात आली आहे.
मध्यप्रदेश, बिहार, छत्तीसगड, ओडीसा, उत्तरप्रदेश व झारखंड या राज्यातील मजूर मोठ्या संख्येने गुजरातमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कामावर असल्याने लॉकडाऊनमध्ये अडकून पडले होते. आपल्या घराकडे सायकल व पायी तथा मिळेल त्या साधनांचा वापर करीत घराकडे परतणाºया मजूर व कामगारांच्या सेवेत राज्य शासनाने लालपरी दाखल करून दिली. राज्याच्या सीमेवरुन त्यांच्या वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली. १० मे पासून हे कार्य सुरू झाले होते.
सीमा परिवहन तपासणी नाक्यावर परप्रांतीय मजूर व कामगारांची दिवसेंदिवस संख्या वाढत गेल्याने नवापूर आगार व जिल्ह्यातील इतर आगारांमधील जवळपास १०० बसेसच्या जोडीला औरंगाबाद विभागातील ७५, जळगांव विभागातून ५० व धुळे विभागातून १०० बसेस असे मिळून २२५ जादा बसेस नवापुरात दाखल झालेल्या होत्या. गेल्या मंगळवारी सायंकाळी एकाचवेळी सात हजाराहुन अधिक लोकांचा जमाव तेथे आल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती. दररोज सीमेवर हजारोंच्या संख्येने लोक येत असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड व जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी सीमेवर भेटी दिल्या होत्या. भेटीनंतर त्यांनी समाधान व्यक्त केले होते.
सीमा तपासणी नाक्यावरून मध्यप्रदेशच्या सीमेवर सर्वाधिक १९ हजार ८८८ प्रवाश्यांसाठी बसेसच्या ९०७ फेºया, छत्तीसगड सीमेवर दोन हजार ३७६ प्रवाश्यांसाठी बसेसच्या १०८ फेºया व राज्यांतर्गत एक हजार २७६ प्रवाशांसाठी बसेसच्या ५८ फेºया झाल्या. राज्य परिवहन महामंडळाने यासाठी एक कोटी ९६ लाख २१ हजार ३८५ रूपये खर्च करून २३ हजार ५४० प्रवाशांच्या घरवापसीचे कार्य पार पाडले.
गुजरातमधून मजूर व कामगारांची आवक थांबल्याने सध्या सीमेवरील इतर आगारांच्या आलेल्या सर्व बसेस माघारी झाल्या आहेत. सर्व स्थानिक बसेसही आगारात आल्याने सीमेवर शुकशुकाट आहे.

लॉकडाऊनमुळे महामार्गावर जेवणाची सोय नसतांना प्रवासी, चालक व वाहकांची जेवणाची समस्या नवापूर शहरातील जागृत नागरीक, सामाजिक व धार्मिक संघटनांकडून अविरत सुरू ठेवण्यात आलेल्या अन्नदान मोहिमेमुळे सुटू शकली. हे कार्य लॉकडाऊन सुरु झाल्यापासून ते अविरतपणे पार पाडत आल्याने प्रवासी व चालक वाहकांची बºयाच अंशी सोय होऊ शकली.