सुसरी धरणाच्या पाणी पातळीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 12:33 IST2020-05-13T12:33:02+5:302020-05-13T12:33:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील शहादा-खेतिया रस्त्यावरील सुसरी धरणाच्या पाण्याची पातळी खालावत असल्याने मृतसाठा शिल्लक आहे. वाढत्या ...

Decrease in water level of Susari Dam | सुसरी धरणाच्या पाणी पातळीत घट

सुसरी धरणाच्या पाणी पातळीत घट

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील शहादा-खेतिया रस्त्यावरील सुसरी धरणाच्या पाण्याची पातळी खालावत असल्याने मृतसाठा शिल्लक आहे.
वाढत्या उष्णतेबरोबर जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. खालावणाऱ्या पाण्याच्या पातळीने विहिरी आटू लागल्या आहेत. तर कुपनलिकांचेही पाणी काही प्रमाणात पाणी कमी झाले आहे. त्यामुळे तालुक्यात अनेक गावात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी उपाययोजना करणे अपेक्षित आहे. गेल्यावर्षी आॅगस्टच्या परतीच्या पावसाला चांगलाच जोर आल्यामुळे १५ दिवस या पावसाने चांगलाच धूमाकूळ घातला होता. या दमदार पावसामुळे सुसरी धरणाच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली होती. परंतु एप्रिल महिन्यापासून दिवसेंदिवस वाढत्या उष्णतेमुळे सुसरी धरणाची पाणी पातळी खालावत आहे. यामुळे शेतकऱ्यांबरोबरच मासेमारी करणारेही संकटात सापडण्याची वेळ निर्माण झाली आहे.
गाळ काढण्यास अल्प प्रतिसाद
धरणातील गाळ शेतात टाकल्यामुळे रासायनिक खतामुळे जमिनीची झालेली हानी भरून निघते व जमीन सुपीक होते. त्यामुळे परिसरातील शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून गाळचा उपसा करतात. हा गाळ जेसीबी मशीनद्वारे काढण्यात येत असून त्याची ट्रॅक्टर व डपंरच्या सहाय्याने वाहतूक केली जात असते. परंतु यंदा कोरोना महामारीमुळे शेतकºयांचे आर्थिक गणित बिघडले असून शेतमालाला भाव नसल्याने माल शेतातच खराब होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे हातात पैसा नसल्याने शेतात गाळ टाकण्यास अल्प प्रतिसाद दिसून येत आहे.

Web Title: Decrease in water level of Susari Dam