शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

१० लाखांच्या आतील कामे ई-टेंडरिंगतून वगळण्याचा ग्रामविकास विभागाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:24 IST

निदान १० लाखांच्या आतील कामे तरी ग्रामपंचायतीच्या स्तरावर करू देण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांकडून शासनाच्या संबंधित विभागाकडे ...

निदान १० लाखांच्या आतील कामे तरी ग्रामपंचायतीच्या स्तरावर करू देण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांकडून शासनाच्या संबंधित विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार गेल्या २७ मे रोजी ग्रामविकास विभागाने १० लाखांच्या आतील कामांची ऑनलाईन निविदा न काढण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच या निधीच्या आतील विकासकामे स्वतः ग्रामपंचायत करेल. साहजिकच ग्रामविकासाच्या कामांनादेखील ब्रेक बसणार नाही. शिवाय ग्रामपंचायतीची अधिकारी, ठेकेदार यांचा मागे फिरण्याची कटकटही थांबणार आहे. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाचे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे; परंतु पदाधिकारी आणि प्रशासनाने कामांचा दर्जा चांगला राखण्याची अपेक्षा ग्रामीण जनतेने व्यक्त केली आहे.

वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या मनमानीस बसणार चाप

जिल्हा परिषद, पंचायत समितीचे पदाधिकारी, सदस्य अथवा वरिष्ठ अधिकारी यांच्या मनमानीसदेखील शासनाच्या या निर्णयामुळे चाप लागणार आहे. कारण या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधी प्रमुख अधिकाऱ्यांना हाताशी धरून ग्रामपंचायतीचे रस्ते असो किंवा अंगणवाड्यांचे बांधकाम असो पंचायतींना विश्वासात न घेता परस्पर टेंडरिंग करून आपल्या मनमानी पद्धतीने कामे करीत असत. साहजिकच यामुळे कामेही थातुरमातुर केली जात होती. तळोदा तालुक्यात गेल्यावर्षी काही अंगणवाड्यांची नवीन दुरुस्तीची कामे ग्रामपंचायतीना अंधारात ठेवून करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

टेडरिंग प्रक्रियेचा वेळ वाचला

विकासकामांचा निधी शासनकडून उपलब्ध झाल्याबरोबर संबंधित यंत्रणेकडून कामाच्या निविदेची प्रक्रिया राबवली जाते. यात ठेकेदारांकडून टेंडर भरण्याची वाट पहिली जात असते. त्यामुळे प्रक्रियेला तब्बल १० ते १२ दिवस लागतात. त्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू करण्याची वर्क आऊट दिली जाते. परिणामी, काम सुरू करण्यासाठी मोठा अवधी जात असतो. एकप्रकारे यातून पंचायतींचा वेळ वाचला आहे. मात्र, शासनाच्या या निर्णयाचा सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना फटका बसणार आहे. कारण ग्रामीण पातळीवरील अनेक अभियंत्यांना याचा लाभ होत असे.

१० लाखांच्या आतील कामांचे ऑनलाईन टेंडर शासनाने आता रद्द केल्यामुळे पंचायतींच्या विकासकामांना गती मिळून कामे लवकर मार्गी लागतील. त्यामुळे शासनाच्या निर्णयाचे स्वागत आहे.

- जंगलसिंग ठाकरे, सरपंच, धानोरा, ता. तळोदा.

टेंडरच्या प्रक्रियेमुळे खूप वेळ जातो. त्यामुळे विकासकामेसुद्धा वेळेवर सुरू होत नाहीत. आता शासनाने १० लाखांची कामे ग्रामपंचायत स्तरावर करण्याचा अधिकार दिल्याने कामांचा दर्जा सुधारेल व कामे लवकर मार्गी लागतील.

- यमुना पावरा, सरपंच, गोपाळपूर पुनर्वसन, ता. तळोदा.