शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

अपेक्षित भाव मिळाला तरच पपई देण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : पपईच्या घसरत्या दराबाबत तळोदा तालुक्यातील पपई उत्पादक शेतकरी एकवटले असून, व्यापाऱ्यांची मनमानी रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : पपईच्या घसरत्या दराबाबत तळोदा तालुक्यातील पपई उत्पादक शेतकरी एकवटले असून, व्यापाऱ्यांची मनमानी रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी एक हजार ८०० रूपये क्विंटल दर दिल्याशिवाय पपई न देण्याचा निर्णय बैठकीत घेतला आहे.तळोदा तालुक्यातील पपईचे उत्पादन परिपक्वझाल्यामुळे पपई खरेदीसाठी बाहेरील व्यावसायिकदेखील खरेदीसाठी सक्रीय झाले आहेत. गेल्या आठवड्यापूर्वी पपईस क्विंटलला एक हजार ८०० रूपये दराने खरेदी करत असत. त्यानंतर एक हजार ५०० रूपये दर दिला. आता तर एक हजार २०० रूपयांनी खरेदी करीत आहेत. त्यामुळे शेतकºयांनी या व्यापाºयांच्या मनमानी कारभारावर व्यसन घालण्यासाठी पपई न देण्याचा निर्णय घेतला आहे.याप्रकरणी येथील कनकेश्वर मंदिरात गुरूवारी दुपारी तळोदा तालुक्यातील पपई उत्पादक शेतकºयांची बैठक घेतली. या वेळी पपईच्या दिवसेंदिवस घसरत्या दराबाबत शेतकºयांनी चर्चा केली. दिल्लीतील कोहरा, जाळपोळ या घटनांमुळे वाहतूक व मालास मागणी होत नसल्याचे कारण पुढे करत व्यापारी आपल्या मनमानीपणे पपईचे दर कमी करीत आहेत. यामुळे एकप्रकारे शेतकºयांची आर्थिक लूटच करीत असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे. वास्तविक यंदा तालुक्यातील अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्तीमुळे पपई बरोबर सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. साहजिकच शेतकºयांनी त्यावर केलेला रासायनिक खतांचा वापर व इतर खर्चदेखील निघणार नाही. त्यामुळे शेतकरी अक्षरश: मेटाकुटीला आला आहे, असे असतांना व्यापारी थातूर-मातूर कारण पुढे करून पपईचा दर दिवसेंदिवस कमी करीत आहे.व्यापाºयांच्या अशा अडवणुकीच्या धोरणाबाबत शेतकºयांनी तीव्र संताप व्यक्त करून जो पावेतो हे व्यापारी क्विंटल मागे एक हजार ५०० रूपये भाव देणार नाही तो पावेतो शेतकºयांनीही पपईची कटींग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जो शेतकरी देईल त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. बैठकीत संजय पटेल, भरत पाटील, महेंद्र पाटील, भगवान पाटील, नरेंद्र पाटील, कपील भारती, राजेश पटेल, पंकज पाटील, राजाराम पाटील, तुंबा पाटील, मोहन पाटील, दीपक पाटील, आकाश पाटील, भानुदास माळी आदी शेतकरी उपस्थित होते.