विसरवाडीचा आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:28 IST2021-03-15T04:28:20+5:302021-03-15T04:28:20+5:30

बैठकीला सरपंच बकाराम गावीत, पं.स.चे माजी सदस्य सुरेश गावीत, ग्रामविकास अधिकारी कैलास सोनवणे, हसीम कलकत्तेवाला, धारासिंग गोसावी, जीवन तांबोळी, ...

Decision to keep Visarwadi weekly market closed | विसरवाडीचा आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय

विसरवाडीचा आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय

बैठकीला सरपंच बकाराम गावीत, पं.स.चे माजी सदस्य सुरेश गावीत, ग्रामविकास अधिकारी कैलास सोनवणे, हसीम कलकत्तेवाला, धारासिंग गोसावी, जीवन तांबोळी, रवींद्र अग्रवाल, संजय शर्मा, फारूख हवेलीवाला, अबित शेख, सचिन तांबोळी, जगन्नाथ तांबोळी, राजू पाडवी, दीपक सैंदाणे, योगेश तांबोळी व व्यापारी उपस्थित होते.

सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये संक्रमण वाढत चाललेले आहे. या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली. बैठकीत सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी सांगितले की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुढील आदेश येईपर्यंत विसरवाडी गावातील दर गुरुवारी भरणारा आठवडी बाजार बंद ठेवावा, आगामी होळी सणानिमित्त व्यापाऱ्यांनी रस्त्यावर दुकाने लावू नये, व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानासमोर दुचाकी व चारचाकी वाहने लावण्यासाठी पार्किंगची व्यवस्था करावी. रस्त्याच्या मधोमध वाहने लावणाऱ्या वाहनधारकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये, सामाजिक अंतर व मास्कचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Decision to keep Visarwadi weekly market closed