शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

अट्टल घरफोडय़ांना एलसीबीकडून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बसस्थानकातील चोरी आणि इतर घरफोडी प्रकरणातील दोन चोरटय़ांना स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाने अटक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बसस्थानकातील चोरी आणि इतर घरफोडी प्रकरणातील दोन चोरटय़ांना स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून आणखी काही चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे. लल्लू उर्फ दिनेश पप्पू तमायचेकर (29) व तानसिंग उर्फ तान्या मोहन अभंगे (27) दोन्ही रा.नंदुरबार असे संशयीतांची नावे आहेत. नंदुरबार बसस्थानकात वाहकाचे पैसे चोरून नेल्याची घटना घडली होती. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी याबाबत तपासाचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे पथक गस्तीवर असतांना त्यांना बसस्थानक परिसरातील बाजार समितीलगतच्या धान्य गोदामाच्या मागे एकजण बसलेला आढळून आला. त्याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याने त्याचे नाव लल्लू उर्फ दिनेश तमायचेकर असल्याचे सांगितले. त्याची चौकशी केली असता बसस्थानकातील वाहकाचे पैसे चोरल्याचे सांगितले. शिवाय आपल्यासोबत आणखी एकजण असल्याचीही कबुली त्याने दिली. त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने दुसरा संशयीत तान्या अभंगे हा एमएसईबी कार्यालयाच्या पाठीमागे लपून बसलेला असल्याचे सांगितले. एलसीबीच्या कर्मचा:यांनी लागलीच त्या ठिकाणी धाव घेतली असता काटेरी झुडपात एकजण झोपलेला आढळला. त्याला देखील झडप घालून ताब्यात घेतले असता त्याने तान्या अभंगे असल्याचे सांगितले. शिवाय चोरीची कबुली दिली. या दोन्ही संशयीतांवर यापूर्वी देखील घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले, उपनिरिक्षक भगवान कोळी, पोलीस कर्मचारी राकेश मोरे, पुष्पलता जाधव, मोहन ढमढेरे, आनंदा मराठे, अभय राजपूत, किरण मोरे यांच्या पथकाने केली.