शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

लाॅकडाऊनमध्येही ‘दे दारू’ ; दुकाने बंद असूनही विक्री जोरात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:31 IST

नंदुरबार : एप्रिल २०२० पासून कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर त्याचा संसर्ग रोखून धरण्यासाठी सातत्याने लाॅकडाऊन केले जात आहे. यात बाजारपेठा ...

नंदुरबार : एप्रिल २०२० पासून कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर त्याचा संसर्ग रोखून धरण्यासाठी सातत्याने लाॅकडाऊन केले जात आहे. यात बाजारपेठा बंद असल्याने आर्थिक संकट वाढले आहे. परंतु यादरम्यान शासनाच्या तिजोरीला महसूल मिळवून देणाऱ्या मद्याची विक्री मात्र वाढली आहे. यातही आर्थिक चणचणीमुळे विदेशीपेक्षा तळीरामांनी देशी दारूला अधिक पसंती दिल्याचे गेल्या वर्षात दिसून आले आहे.

मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यांच्या सीमेवर असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात मद्य तस्करीचे गुन्हे दर दोन-चार दिवसांनी समोर येतात. यातून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सातत्याने कारवाया करून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात येतो. गेल्या वर्षात लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य तस्करीत वाढ झाल्याने कारवाईला गती आली होती. दरम्यान, जिल्ह्यात २०१९-२० च्या तुलनेत २०२०-२१ या वर्षात मद्याची विक्री अधिक असल्याचे दिसून आले आहे. सततच्या लाॅकडाऊनमुळे मिळालेल्या सुट्ट्यांचा परिणाम दारू विक्रीवर झाला असल्याचा दावा संबंधित विभागाने केला आहे. जिल्ह्यात दरवर्षी विदेशी मद्य, बीअर यांची विक्री अधिक होते. परंतु, २०२०-२१ या वर्षात मात्र देशी मद्याची सर्वाधिक विक्री झाली असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट करण्यात येत आहे. लाॅकडाऊनमध्येही हे मद्य सर्वाधिक विक्री झाले.

जिल्ह्यात २०२०-२१ या वर्षात ३३ लाख लिटर देशी दारू विक्री झाली आहे. विदेशीच्या तुलनेत हे आकडे दुप्पट आहेत.

दुसरीकडे केवळ १९ लाख लिटर विदेशी दारू विक्री झाली आहे. गेल्या वर्षातील निर्बंधामुळे या दारूची विक्री कमी झाल्याचे बोलले जात आहे.

बरेच जण ऋतुमानानुसार मद्याची मागणी करतात. यातून बीअरची विक्री कमी झाली आहे. जिल्ह्यात २० लाख लिटर बीअर विक्री गतवर्षी झाली.

तस्करीचे ६१३ गुन्हे

२०२०-२१ या वर्षात दारू तस्करीचे एकूण ६१३ गुन्हे राज्य उत्पादन शुल्क विभागाने दाखल केले आहेत. यातून २४० जणांना अटक झाली होती.

या गुन्ह्यांमधून एक कोटी ४५ लाख ७५ हजार ८७४ रुपयांचा मुद्देमाल विभागाने जप्त केल्याची माहिती देण्यात आली.

महसुलाची टक्केवारी ११० टक्के

लाॅकडाऊनमुळे इतर विभागातून मिळणारा महसूल कमी झाला असला तरी मद्यविक्रीतून जिल्ह्याला ११ कोटी ८४ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.

विशेष बाब म्हणजे जिल्ह्याला या वर्षात केवळ नऊ कोटी रुपयांचे उद्दिष्ट शासनाने दिले होते.

राज्य उत्पादन शुल्क विभाग सातत्याने अवैध मद्यविक्रेत्यांवर कारवाई करीत आहे. अवैध तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न होत आहेत. वर्षभर ठेवलेल्या सातत्यामुळे ६०० पेक्षा अधिक गुन्हे दाखल करून अवैध मद्यविक्री आणि तस्करीवर चाप बसविला गेला आहे.