शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता वाहून गेल्याने धोकेदायक स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 11:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील मामाचे मोहिदे गावालगत गेलेल्या भेंडवा नाल्याजवळ नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे फरशीचा भराव व ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील मामाचे मोहिदे गावालगत गेलेल्या भेंडवा नाल्याजवळ नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे फरशीचा भराव व रस्ता वाहून गेल्याने वाहतुकीला अडथळा ठरत आहे. याठिकाणी कारसारखे वाहन काढतानाही त्रास होत आहे. वारंवार मागणी करुनही याठिकाणी संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे फरशीचे बांधकाम झाले नसल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. भराव व रस्ता वाहून गेल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.शहादा शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर मामाचे मोहिदे गावाच्या पूर्व दिशेकडून सोनवद, कहाटूळ, जयनगर, लोंढरे, वडाळी, फेस, बामखेडा, शिरपूर असा मार्ग जातो. बऱ्याचवेळा शहादा-शिरपूर रस्ता नादुरूस्त राहिल्यास अथवा रहदारी खोळंबली तर या मार्गाने जड वाहने ये-जा करतात. मोहिदे गावापासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर जयनगर येथे श्री हेरंब गणेशाचे मंदिर असल्याने भाविकांची नेहमी ये-जा सुरू असते. मोहिदे गावालगत भेंडवा नाला गेला आहे. डोंगरगाव, वडछील, पुनर्वसन, उभादगड या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे भेंडवा नाल्याला पाणी येते. मोहिदे गावालगत असलेल्या फरशीवरून पाणी वाहते. त्यामुळे तास-दोन तास वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. गेल्यावर्षी या फरशीलगत रस्त्याचे निकृष्ट काम झाल्यामुळे मोठा बोगदा पडला होता. यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्पुरता मातीचा भराव केला होता.मोहिदे गावाच्या पूर्वेला जय जवान जय किसान माध्यमिक शाळेच्या इमारीला लागूनच भेंडवा नाल्यास पावसाळ्यात पाणी येते. या शाळेजवळील फरशीवरुनही पाणी वाहत असल्याने विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना शाळेत जाणे अवघड होते. तसेच शेतमजुरांनाही शेतात कामासाठी जाण्यासाठी अडचणी येतात. मोहिदे ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार लेखी तक्रार देऊन व प्रत्यक्ष भेटून भेंडवा नाल्यावरील फरशीची उंची वाढविण्याची मागणी केली आहे. मात्र संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे या नाल्याला पूर आल्याने या फरशीजवळील भराव व रस्ता वाहून गेला आहे. खचलेल्या रस्त्यालगत टाकलेला मुरूमही पाण्यात वाहून गेल्याने रस्त्यावरून कारसारखे वाहन काढणेही कठीण झाले आहे. अजून जोरदार पाऊस होऊन पूर आला तर उरलेला रस्ताही वाहून जाऊन या मार्गावरील वाहतूक बंद होऊ शकते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी संबंधित फरशीच्या ठिकाणी खचलेल्या रस्त्याचे काम त्वरित युद्धपातळीवर करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे.