शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
4
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
6
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
9
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
10
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
11
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
12
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
13
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
14
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
15
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
16
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
17
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
18
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
19
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
20
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचे पाणी शिरुन घराचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 13:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : निसर्ग चक्रीवादळाचे दुष्परिणाम तालुक्यात जाणवले नसले तरी बुधवारी दिवसभर पाऊस सुरू होता. तालुक्यात सरासरी ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : निसर्ग चक्रीवादळाचे दुष्परिणाम तालुक्यात जाणवले नसले तरी बुधवारी दिवसभर पाऊस सुरू होता. तालुक्यात सरासरी ४४ मिलीमीटर पाऊस झाल्याची माहिती महसूल विभागामार्फत देण्यात आली. सर्वाधिक १०५ मिलिमीटर पाऊस म्हसावद मंडळ तर सर्वात कमी नऊ मिलिमीटर पाऊस मंदाणे मंडळात झाला आहे. शहादा शहरात सालदारनगर भागात एका महिलेच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.बुधवारी दुपारपासून पावसाला सुरुवात झाली. रिमझिम सुरु असलेल्या पावसाने रात्री दहानंतर जोर धरला होता. या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. रात्री दोन वाजेच्या सुमारास झालेल्या पावसामुळे सालदारनगर भागातील गुंताबाई कृष्णा माळी या महिलेच्या घराचे नुकसान झाले आहे. पावसामुळे घराचे छप्पर व भिंत असल्यामुळे पावसाचे पाणी घरात शिरले. संपूर्ण घरात चिखलाचा खच झाला होता. यात घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. पावसामुळे घरात थांबणेही शक्य नसल्याने महिला व तिच्या कुटुंबीयांनी संपूर्ण रात्र शेजाऱ्यांकडे आसरा घेऊन काढली. महसूल विभागामार्फत नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे. या पावसामुळे तापमानातही कमालीची घट झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता.तालुक्यात बुधवारी मंडळनिहाय झालेला पाऊस (मिमिमध्ये) असा कंसात एकूण : शहादा ४८ (५१), प्रकाशा ४५ (४७), कलसाडी ५५ (५९), म्हसावद १०५ (१०७), ब्राह्मणपुरी ६२ (६२), असलोद १३ (१३), मंदाणे ९ (९), वडाळी २४ (३५), सारंगखेडा ३९.४ (४१.४), मोहिदे ३७ (४८).