शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे शहादा तालुक्यात पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:24 IST

शहादा तालुक्यात शुक्रवारी दुपारपासून पावसाची रिपरिप सुरू झाली. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर शनिवारी पहाटेपर्यंत जोरदार पाऊस झाला. शेल्टी, ससदे, टेंभा या ...

शहादा तालुक्यात शुक्रवारी दुपारपासून पावसाची रिपरिप सुरू झाली. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर शनिवारी पहाटेपर्यंत जोरदार पाऊस झाला. शेल्टी, ससदे, टेंभा या परिसरातील शेतात गुडघ्याएवढे पाणी साचल्याने गहू, हरभरा, केळी, पपईचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही शेतांचे बांध फोडून पाण्याचा प्रवाह झाल्याने पिके वाहून गेली आहेत. मगन देवीदास पाटील, डॉ.पी.बी. पाटील, शरद बाबुलाल पाटील, ब्रिजलाल तुमडू पाटील, डॉ.रवींद्र दशरथ पाटील, नितीन नथ्‍थू पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. वादळ व पावसामुळे गव्हाचे पीक जमीनदोस्त झाले, तर हरभऱ्याचे पीकही पाण्याखाली आले आहे. तोडणीवर आलेली केळी व पपईची झाडे जमिनीवर तुटून पडल्याने मोेठे नुकसान झाले आहे.

ऊसतोड मजुरांचे हाल

सातपुडा व पुष्पदंतेश्वर साखर कारखान्यात ऊसतोडणीसाठी आलेल्या मजुरांचे वास्तव्य सध्या शेतशिवारात आहे. अवकाळी पावसामुळे या मजुरांच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. तसेच वृद्ध व लहान मुलांचे हाल झाले. या मजुरांची व त्यांच्या कुटुंबांची अवकाळी पावसामुळे एकच तारांबळ उडाली होती.

पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

तालुक्यात शनिवारी सकाळी सहा वाजेपर्यंत झालेल्या मंडलनिहाय पावसाची नोंद तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी दिली. त्यात शहादा १८, प्रकाशा २८, कलसाडी १६, म्हसावद सात, ब्राह्मणपुरी सात, मंदाणे तीन, वडाळी ११ तर सारंगखेडा मंडळात १२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. प्रांताधिकारी डाॅ. चेतन गिरासे व तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी मंडल अधिकारी व तलाठ्यांना तातडीने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, ससदे ते टेंभा रस्त्यावर उसाच्या टिपऱ्यांनी भरलेले ट्रॅक्टर रस्त्यालगत उलटून अपघात झाला. या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून साइडपट्ट्या नसल्याने हा अपघात झाला. त्यात उसाचे व ट्रॅक्टरचे नुकसान झाले.