शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

जात पडताळणी कार्यालयात झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  शहरातील विभागीय जात पडताळणी समिती कार्यालयात दोन दिवसांपासून तोबा गर्दी उसळली आहे. ग्रामपंचायत निवडणूकीच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  शहरातील विभागीय जात पडताळणी समिती कार्यालयात दोन दिवसांपासून तोबा गर्दी उसळली आहे. ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर होणा-या गर्दीला आवर घालण्यासाठी गुरुवारी समितीला पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला होता. शुक्रवारपासून तीन दिवस सुटी असल्याने बुधवार आणि गुरुवारी जात पडताळणी प्रस्तावांचा अक्षरश: पाऊस पडला असून ८०० जणांचे प्रस्ताव जमा करुन त्यांना निवडणूक लढवण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्यात ग्रामपंचायत निवडणूकांचा कार्यक्रम घोषित झाला आहे. यांतर्गत आरक्षित जागांवर निवडणूक लढवू इच्छिणा-या विविध संवर्गातील उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. या प्रमाणपत्रांसाठी त्या-त्या संवर्गातील व्यक्ती जात पडताळणी समित्यांच्या कार्यालयांमध्ये प्रस्ताव देत समितीचे टोकन घेत सज्ज होत आहे. धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील १ हजार ८८ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहिर झाल्यानंतर अनुसुिचत जमाती प्रमाणपत्र असलेले पुन्हा नंदुरबारच्या दिशेने निघाले होते. यातून बुधवारपासूनच येथे गर्दी होण्यास सुरुवात झाली होती. बुधवारी रात्री उशिरापर्यंत येथे कामकाज सुरू असल्याची माहिती देण्यात आली होती. दरम्यान गुरुवारी सकाळपासून तिन्ही जिल्ह्यातून मोठ्या संख्येने चारचाकी व दुचाकी वाहनांनी इच्छुक उमेदवार याठिकाणी दाखल झाले होते. मोठी गर्दी झाल्याने समितीकडून मुख्य प्रवेशद्वारे बंद करत केवळ एक खिडकी सुरू करण्यात आली. परंतू येथे गर्दी होत असल्याने दुपारी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस बंदोबस्तानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्याची माहिती देण्यात आली आहे. 

    बुधवारी ४५० प्रस्ताव बुधवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस होता. यातून नंदुरबार जात पडताळणी समितीकडे दिवसभरात ४५० प्रस्ताव दाखल झाले. या सर्वांना टोकन देत निवडणूक लढवण्यास मुभा देण्यात आली. आलेल्या प्रस्तावांपैकी सर्वाधिक प्रस्ताव हे जळगाव जिल्ह्यातील होते. 

  गुरुवारीही ४०० च्या पुढे  गुरुवारी दिवसभरात ४०० जणांना टोकन देत निवडणूक लढवण्याचा मार्ग माेकळा करण्यात आला.  प्रमाणपत्र घेवून गेलेला उमेदवार निवडून आल्या वर्षभरात ऑनलाईन पद्धतीने वैधतेसाठी त्यांना अर्ज करावा लागेल.  समितीकडे प्रस्ताव देण्यात महिलांचाही सहभाग होता. 

निवडणूकांच्या टोकनमुळेही झाली वैधता  दरम्यान एकीकडे ग्रामपंचायत निवडणूकांसाठी जात पडताळणीसाठीचे प्रस्ताव दिले जात असताना निवडणूकीत पराभव पत्करल्यानंतर काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यातील अनेकांकडून पराभव झाल्यानंतरही समितीकडे पाठपुरावा सुरू केला होता. काहींकडून न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करत वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अनेक जण निवडणूकांच्या सोबतच जात पडताळणीसाठी प्रस्ताव सादर करुन नंतर माघार घेत केवळ जात पडताळणी करुन घेण्यासाठी पाठपुरावा करत असल्याचे समोर आले आहे.  २८ रोजी कामकाज सुरु झाल्यानंतर इच्छुकांकडे केवळ दोनच दिवस शिल्लक राहत असल्याने त्या दोन दिवसातही गर्दी वाढणार असल्याचे संकेत आहेत. यातून समितीकडून तयारी करण्यात आली आहे.