तळोदा तालुक्यात वादळी पावसामुळे पिके भूईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 12:31 PM2020-08-14T12:31:54+5:302020-08-14T12:33:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा तालुक्यात ७ आॅगस्ट रोजी झालेला वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे पिकांचे नुकान झाले होते़ ...

Crops leveled in Taloda taluka due to heavy rains | तळोदा तालुक्यात वादळी पावसामुळे पिके भूईसपाट

तळोदा तालुक्यात वादळी पावसामुळे पिके भूईसपाट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : तळोदा तालुक्यात ७ आॅगस्ट रोजी झालेला वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे पिकांचे नुकान झाले होते़ या पिकांचे पंचनामे करुन भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे़
वादळी पावसामुळे ऊस, ज्वारी आणि मका पिकाचे नुकसान झाले आहे़ बहुतांश ठिकाणी पीक जमिनदोस्त झाल्याने उत्पन्न येणार नाही़ यामुळे शेतकरी उत्पादनाला मुकले आहेत़ पाच दिवस उलटूनही महसूल विभागाने लक्ष दिले नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़ तळोदा तालुक्यात गेल्या आठवड्या भरापासून जोरदार पाऊस होत आहे पावसाबरोबर सुसाट वारा सुरू होत असल्याने ऊस, ज्वारी, मका जमिनी लगत आडवे पडत आहे़ यात मका आणि ज्वारी यांचे सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती आहे़ सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती आहे़ मोकसमाळ येथील किशोर राज्या पाडवी यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले़ याकडे संबंधित विभागाने लक्ष देत नुकसानग्रस्त क्षेत्रांचे पंचनामे करुन भरपाई देण्याची मागणी होत आहे़

Web Title: Crops leveled in Taloda taluka due to heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.