सलुन सुरू केल्याने एकाविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 11:59 IST2020-06-11T11:59:47+5:302020-06-11T11:59:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या प्रादुर्भाव होण्याच्या भितीमुळे सध्या सलुन दुकान बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे ...

Crime against one for starting a salon | सलुन सुरू केल्याने एकाविरुद्ध गुन्हा

सलुन सुरू केल्याने एकाविरुद्ध गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाच्या प्रादुर्भाव होण्याच्या भितीमुळे सध्या सलुन दुकान बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे असतांनाही दुकानात हा व्यवसाय केल्याप्रकरणी नंदुरबारात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सलुन दुकाने सध्या बंदच असल्यामुळे या व्यावसायिकांची उपासमार सुरू आहे. असे असले तरी प्रतिबंधीत व्यवसाय असतांनाही नंदुरबारातील एकाने दुकानात ग्राहक बोलवून व्यावसाय केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळ बाजारातील एका दुकानाचे शटर अर्धवट उघडून एका व्यावसायिकांने हा प्रकार केला. गस्तीवरील पोलीस कर्मचारी जयेश गावीत, शैलेंद्र माळी, श्रीकांत पाटील यांनी त्या ठिकाणी जावून संबधीत व्यावसायिकावर कारवाई केली. याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने संबधीत व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लॉकडाऊनच्या काळात व्यावसाय बंद ठेवावा, आदेशाचे उल्लंघन करू नये तसे झाल्यास कारवाई करण्यात येईल असे आवाहन पोलीस आणि जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Crime against one for starting a salon