शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

देवलीपाडासह कडवानच्या रेशन दुकानदाराविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 12:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापूर तालुक्यातील देवलीपाडा येथील स्वस्त धान्य दुकानदाराविरुद्ध ग्रामस्थांच्या तक्रारीची जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांनी दखल ...

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : नवापूर तालुक्यातील देवलीपाडा येथील स्वस्त धान्य दुकानदाराविरुद्ध ग्रामस्थांच्या तक्रारीची जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांनी दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय लहान कडवान येथील दुकानदाराविरुद्धही गुन्हा दाखल झाला.शिधापत्रिका धारकांना नियमाप्रमाणे रेशन धान्य मिळते का? याबाबत खात्री करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.भारुड, सहाय्यक जिल्हाधिकारी व नवापूर तहसीलदार सुनिता ज:हाड यांनी नवापूर तालुक्यातील गावांना भेट देत होते. त्यादरम्यान त्यांनी देवलीपाडा येथे भेट देली. येथील 44 ग्रामस्थांनी नियमाप्रमाणे रेशन धान्य मिळत नसल्याची तक्रार केली होती.दरम्यान, अधिका:यांनी देवलीपाडा गावातील स्वस्त धान्य दुकानात भेट दिली असता रेशन दुकानदार शैल्या पाण्या गावीत हा गावातील शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या हक्काच्या धान्यापासून   वंचित ठेवत असून, शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणानुसार अन्न धान्याचे वाटप केलेले नसल्याचे स्पष्ट       झाले. तसेच दुकानदाराने उचलेले धान्य वाटप व शिल्लक धान्य यातदेखील मोठी तफावत आढळून आली.पुरवठा निरीक्षक रवींद्र निंबा कानडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलीस ठाण्यात स्वस्त धान्य दुकानदार शैल्या पाण्या गावीत यांच्या विरूद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे करीत आहेत.दरम्यान, तीन दिवसांपूर्वी लहान कडवान येथील दुकानदार सतिष भावजी गावीत याच्याविरुद्धही कारवाई केली होती. त्यांच्यावरही आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.