देवलीपाडासह कडवानच्या रेशन दुकानदाराविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 12:34 IST2020-04-11T12:33:57+5:302020-04-11T12:34:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापूर तालुक्यातील देवलीपाडा येथील स्वस्त धान्य दुकानदाराविरुद्ध ग्रामस्थांच्या तक्रारीची जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांनी दखल ...

Crime against Kadwan's ration shopkeeper along with Devlipada | देवलीपाडासह कडवानच्या रेशन दुकानदाराविरुद्ध गुन्हा

देवलीपाडासह कडवानच्या रेशन दुकानदाराविरुद्ध गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : नवापूर तालुक्यातील देवलीपाडा येथील स्वस्त धान्य दुकानदाराविरुद्ध ग्रामस्थांच्या तक्रारीची जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांनी दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय लहान कडवान येथील दुकानदाराविरुद्धही गुन्हा दाखल झाला.
शिधापत्रिका धारकांना नियमाप्रमाणे रेशन धान्य मिळते का? याबाबत खात्री करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.भारुड, सहाय्यक जिल्हाधिकारी व नवापूर तहसीलदार सुनिता ज:हाड यांनी नवापूर तालुक्यातील गावांना भेट देत होते. त्यादरम्यान त्यांनी देवलीपाडा येथे भेट देली. येथील 44 ग्रामस्थांनी नियमाप्रमाणे रेशन धान्य मिळत नसल्याची तक्रार केली होती.
दरम्यान, अधिका:यांनी देवलीपाडा गावातील स्वस्त धान्य दुकानात भेट दिली असता रेशन दुकानदार शैल्या पाण्या गावीत हा गावातील शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या हक्काच्या धान्यापासून   वंचित ठेवत असून, शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणानुसार अन्न धान्याचे वाटप केलेले नसल्याचे स्पष्ट       झाले. तसेच दुकानदाराने उचलेले धान्य वाटप व शिल्लक धान्य यातदेखील मोठी तफावत आढळून आली.
पुरवठा निरीक्षक रवींद्र निंबा कानडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलीस ठाण्यात स्वस्त धान्य दुकानदार शैल्या पाण्या गावीत यांच्या विरूद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे करीत आहेत.
दरम्यान, तीन दिवसांपूर्वी लहान कडवान येथील दुकानदार सतिष भावजी गावीत याच्याविरुद्धही कारवाई केली होती. त्यांच्यावरही आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Crime against Kadwan's ration shopkeeper along with Devlipada