मानमोडे येथे क्रिकेट स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:32 IST2021-01-23T04:32:38+5:302021-01-23T04:32:38+5:30

असलोद : शहादा तालुक्यातील मानमोडे येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे ...

Cricket tournament at Manmode | मानमोडे येथे क्रिकेट स्पर्धा

मानमोडे येथे क्रिकेट स्पर्धा

असलोद : शहादा तालुक्यातील मानमोडे येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. सुरेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंंचायत समिती सदस्य गोपी पावरा, डॉ. जाधव, म्हसावदचे सतीश धनगर, मंदाणे येथील पत्रकार दिनेश पवार, सरपंच भिवाजी ठाकरे, उपसरपंच योगेश पावरा, पोलीस पाटील विनोद भामरे, सुनील भामरे, मुराल पावरा, राजेश पवार, मानमोडे शाळेचे क्रीडाशिक्षक सुनील भामरे, क्रिकेट स्पर्धेचे आयोजक कपिल चव्हाण, भरत भील, सुरज भील, परिसरातील क्रिकेटप्रेमी व ग्रामस्थ उपस्थित होते. या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस २१ हजार १११ रुपये, द्वितीय बक्षीस ११ हजार १११ रुपये, तृतीय बक्षीस पाच हजार ५५५ रुपये देण्यात येणार आहे. यासह वैयक्तिक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेसाठी मानमोडे येथील ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.

Web Title: Cricket tournament at Manmode