शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
2
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
4
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
5
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
6
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
7
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
8
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
9
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
10
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
11
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
12
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
13
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
14
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
15
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
16
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
17
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
18
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
19
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
20
...तेव्हाच मुंबई, गोवा ड्रग्जमुक्त होऊ शकेल; इथे दबा धरून बसलेत हजारो सलीम डोला
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई येथे कर्तव्य बजावून आलेल्या वाहकाचा कोरोनामुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 13:09 IST

 हर्षल साळुंखे लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोनाचे संक्रमण वाढू नये म्हणून मुंबईतील रेल्वे लोकल सेवा बंद करण्यात आली ...

 हर्षल साळुंखेलोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोनाचे संक्रमण वाढू नये म्हणून मुंबईतील रेल्वे लोकल सेवा बंद करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी लोकल सेवेला पर्याय म्हणून बेस्ट बसच्या माध्यमातून बसफेऱ्याद्वारे प्रवाशांची वाहतूक करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे विविध आगारातून कर्मचारी मुंबई येथे सेवा बजावण्यासाठी जात आहेत. शहादा येथून सेवा देण्यासाठी गेलेले यशवंत तुकाराम सोनवणे या वाहकाचा कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला आहे.संपूर्ण राज्यात कोरोनाची वाढती संख्या बघता शासनाने लॉकडाऊन लावला. मुंबईसारख्या महानगरात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या बघता शासनाने संपूर्ण मुंबईत अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बंद केले. मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी रेल्वेची लोकल सेवा बंद असल्याने मोठ्या प्रमाणावर प्रवासी बेस्ट बसच्या सेवेकडे वळल्याने अतिरिक्त भार पडत असल्यामुळे एस.टी. महामंडळातील विविध आगारातील कर्मचाऱ्यांना मुंबई येथे बेस्ट बसमध्ये सेवा देण्यासाठी बोलविण्यात आले. त्यानुसार शहादा आगारातूनदेखील टप्प्याटप्प्याने चालक व वाहक कर्मचाऱ्यांना आठ ते १५ दिवसांसाठी सेवा बजावण्यासाठी पाठवण्यात आले. मात्र यात कर्मचाऱ्यांचे काही न ऐकता आधीच विविध आजारांनी त्रस्त असलेले व ५० वर्षावरील कर्मचाऱ्यांनाही मुंबईला सेवा देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी पाठवल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे.शहादा आगारातील वाहक यशवंत तुकाराम सोनवणे (५२) हे २८ वर्षापासून शहादा आगारात सेवा देत होते. अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार १४ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे बेस्ट बसेसमध्ये सेवा देण्यासाठी ते गेले होते. आठ दिवस सेवा दिल्यानंतर शहादा येथे परत आल्यावर त्यांना त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांनी कोविड चाचणी करून घेतली. त्यात त्यांचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्याने त्यांना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयातील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना खाजगी रुग्णवाहिकेने नाशिक येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. कोविड नियमानुसार नाशिक येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.मयत यशवंत सोनवणे यांना आधीच हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यानुसार त्यांची ऍन्जिओग्राफी करण्यात आली आहे. त्यांचे वय  ५२ असल्यामुळे मला मुंबई येथे न पाठवता येथे ड्युटी लावण्याची विनंती त्यांनी करूनही अधिकाऱ्यांनी काही न ऐकता भाऊ यशवंत यांना मुंबई येथे पाठवले. आधीच ते आजाराने त्रस्त असूनही त्यांना मुंबईला पाठवल्यामुळे सेवा देत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. मुंबई येथे ते जाण्यास तयार नसतानाही जबरदस्तीने त्यांना पाठविण्यात आले, असा आरोप करीत पाठवणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सोनवणे यांचे भाऊ व कुटुंबाने केली आहे. सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुषाचा मृत्यू झाल्याने सोनवणे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.