फत्तेपूर, डामरखेडा आणि टेंभा येथे कोरोना रुग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:27 IST2021-04-05T04:27:06+5:302021-04-05T04:27:06+5:30

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा फैलाव ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे चित्र आहे. रविवारी तपासणी झालेल्यांपैकी फत्तेपूर, ...

Corona patients increased at Fatehpur, Damarkheda and Tembha | फत्तेपूर, डामरखेडा आणि टेंभा येथे कोरोना रुग्ण वाढले

फत्तेपूर, डामरखेडा आणि टेंभा येथे कोरोना रुग्ण वाढले

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा फैलाव ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे चित्र आहे. रविवारी तपासणी झालेल्यांपैकी फत्तेपूर, डामरखेडा आणि टेंभातर्फे सारंगखेडा या शहादा तालुक्यातील तिन्ही गावांमध्ये रुग्णसंख्या अधिक आढळून आली.

कोरोना संसर्गाचा फैलाव शहरातील विविध वसाहतींसह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर झाल्यागत चित्र आहे. ग्रामीण भागातही तपासणी वाढल्याने तेथे मोठ्या संख्येने रूग्ण आढळून येत आहे. रविवारी ४७० जणांची तपासणी झाली. त्यात १६३ रूग्ण आढळून आले. या रूग्णांमध्ये नंदुरबार तालुक्यातील ५३, शहादा तालुक्यातील ७२, नवापूर तालुक्यातील तीन, तळोदा ३२ आणि अक्कलकुवा तालुक्यातील तीन रूग्ण आढळले आहेत. त्यात फत्तेपूर, ता.शहादा या लहानशा गावात ३० रुग्ण आढळले तर टेंभातर्फे सारंगखेडा या गावातही १८ रूग्ण आढळून आले आहे. डामरखेडा, ता.शहादा येथे देखील १५ रूग्ण मिळाले आहे.

दरम्यान, रविवारी ८३१ जणांची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आली. त्यातही नंदुरबार तालुक्यात ३९, तळोदा ३३ तर नवापूर तालुक्यात २४ रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, ग्रामीण भागात रुग्ण वाढत असल्याने टेस्ट वाढविण्यासंदर्भातही प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे.

Web Title: Corona patients increased at Fatehpur, Damarkheda and Tembha