शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे डोळे उघडले ; शहरामध्ये रुग्णालये वाढली, सुविधाही वाढल्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST

नंदुरबार : कोरोना महामारीसोबत दोन हात करण्यासाठी जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात आरोग्य विभागात मोठे बदल झाले आहेत. प्रामुख्याने सुविधा ...

नंदुरबार : कोरोना महामारीसोबत दोन हात करण्यासाठी जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात आरोग्य विभागात मोठे बदल झाले आहेत. प्रामुख्याने सुविधा वाढवण्यावर भर दिला गेला असून, कधीकाळी एकूण १ हजार बेड असलेल्या जिल्ह्यात एकाचवेळी सहा हजार नागरिक उपचार घेऊ शकतील, अशी सोय झाली आहे.

शासकीय आणि खासगी स्तरावर निर्माण झालेल्या सोयींमुळे जिल्ह्यात दुसरी लाट नियंत्रणात येऊन कोरोनाही नियंत्रणात आहे. दरम्यान, खासगी रुग्णालयांची संख्या ही २३ ने वाढली आहे. शासकीय इमारतींमध्ये व्हेंटिलेटर्ससोबत ऑक्सिजन बेड वाढले आहेत. जिल्ह्यात प्रथमच ऑक्सिजन काॅन्स्ट्रेटरची सुविधा करण्यात आली आहे. हे यंत्र ऑक्सिजनची गरज असलेल्या कोरोना रुग्णांना उपायकारक ठरत असल्याचे सांगण्यात आले आहे. रुग्णांसाठी वाढलेल्या सुविधांचा लाभ येत्या काळात इतर आजारावरच्या रुग्णांनाही होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. परिणामी, येत्या काळात आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम असेल, अशी अपेक्षा असून, या सुविधांची देखभाल नियमित झाल्यास त्या दीर्घकाळ टिकणार आहेत.

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात ऑक्सिजन व व्हेंटिलेटर्सच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यात आजघडीस ८८० बेड हे थेट उपचारांसाठी उपलब्ध आहेत. यात ६४० हे ऑक्सिजन बेड तर ११२ हे व्हेंटिलेटर बेड आहेत. नवापूर, तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालये तसेच शहादा, धडगाव व अक्कलकुवा येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये २४ व्हेंटिलेटर्स दिले गेले असून, २९० बेड हे तैनात करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातही येत्या काळात ऑक्सिजन बेड तयार होणार आहेत. धडगाव व अक्कलकुवा दुर्गम भागातील तालुक्यात ऑक्सिजन व व्हेंटिलेटर्सयुक्त बेड देण्यात आले आहेत.

नंदुरबार रुग्णालयात सर्वाधिक सुविधा

जिल्हा रुग्णालयात गेल्या काही काळात सर्वाधिक सुविधा देण्यात आल्या आहेत. एप्रिल २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर रुग्णांना उपचार देण्यासाठी ४० बेडचा एक कक्ष होता. कालांतराने २०० बेडचे महिला रुग्णालय सुरू झाले. बेडचा विस्तार वाढून ३९० पर्यंत पोहोचला आहे. यात ८८ व्हेंटिलेटर्स, ५५० ऑक्सिजन बेडचा समावेश आहे. जिल्हा रुग्णालयासोबत ५०० खाटांचे दोन कोविड केअर सेंटर नंदुरबार शहरात सुरू होते, तसेच नागरिकांच्या सोयीसाठी कोविड उपचार रेल्वेही सुरू करण्यात आली होती. रुग्णालयात तज्ज्ञ डाॅक्टर्सचाही समावेश करण्यात येत असल्याने रुग्णांच्या उपचारांना योग्य दिशा मिळत आहे.

जिल्हा रुग्णालयासोबत जिल्ह्यातील इतर रुग्णालयांमध्ये सुविधा देण्यात येत आहे. खासगी रुग्णालयांमध्येही सुविधा वाढल्या आहेत. जिल्हा रुग्णालयात २० मेट्रिक टन क्षमतेचे ऑक्सिजन प्लांट सुरू आहेत. त्यातून ऑक्सिजन पुरवठा होऊ शकतो.

-डाॅ. के.डी.सातपुते,

अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक,

ऑक्सिजन काॅन्स्ट्रेटर

n जिल्ह्यात प्रथमच ऑक्सिजन काॅन्स्ट्रेटर प्राप्त झाले आहेत. सध्या जिल्हा रुग्णालयात ३६८ काॅन्स्ट्रेटर असून, जिल्ह्यात ८८६ काॅन्स्ट्रेटर लावले गेले आहेत.

n सोबत १८६ ऑक्सिजन बायपॅप व्हेंटिलेटरही लावले गेल्याची माहिती दिली गेली आहे.