शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

३३ दिवसांनंतर प्रकाशा गावात कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:23 IST

सुमारे १८ हजार लोकवस्तीच्या प्रकाशा गावात २५ एप्रिल ते २७ मे या कालावधीत एकही कोरोना रुग्ण आढळून ...

सुमारे १८ हजार लोकवस्तीच्या प्रकाशा गावात २५ एप्रिल ते २७ मे या कालावधीत एकही कोरोना रुग्ण आढळून न आल्याने गाव कोरोनामुक्त झाले होते. साहजिकच यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र २६ मे रोजी एक १७ वर्षीय तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या तरुणावर मोहिदे येथील कोरोना सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली असता तरुणाचे आई व वडील यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावरही कोरोना सेंटरमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी बी.जी. पाटील यांनी दिली.

दरम्यान, गावात कोरोना शिरकाव झाला असला तरी रुग्ण संख्या वाढू नये म्हणून ग्रामपंचायत, महसूल व पोलीस विभाग यांनी कंबर कसली असून शुक्रवारी ग्रामपंचायतीने प्रकाशा येथील सर्व व्यापाऱ्यांसाठी एक परिपत्रक काढून कोरोना चाचणीची सक्ती केली आहे.

प्रकाशा येथे मोठी बाजारपेठ असून परिसरातील सुमारे १५ गावांतील नागरिक बाजारासाठी प्रकाशा येथे येतात. त्यांचा दुकानदारांशी संपर्क असतो म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये व्यापाऱ्यांनी आरटीपीसीआर चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. म्हणून प्रकाशा येथील व्यापारी व बाहेरगावाहून येणारे सर्व व्यापारी, किराणा दुकानदार, भाजीपाला, फळ विक्रेते, जनरल स्टोअर्स, मेडिकल, कापड दुकानदार, पान दुकानदार, सर्व फेरीवाले, इलेक्ट्रीक दुकानदार, चप्पल- बूट, मासे, मटन, हार्डवेअर, कृषी सेवा केंद्र, पीठ गिरणी, गॅरेज, फुटाणे-लाह्या विक्रेते यांच्यासह दुकानावर काम करणाऱ्या कामगारांनी ३१ मे रोजी ग्रामपंचायत कार्यालय प्रकाशा येथे सकाळी १० वाजेपासून होणाऱ्या कोरोना चाचणी शिबिरात तपासणी करून घेणे बंधनकारक आहे. कोरोना चाचणीनंतर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ज्या व्यापाऱ्यांकडे प्रमाणपत्र असेल त्यांनाच दुकान उघडण्यास परवानगी मिळेल, असे परिपत्रक प्रकाशा ग्रामपंचायतीने काढले आहे. तसेच व्यावसायिकांनी कोरोना नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याने ग्रामपंचायतीकडून कळविण्यात आले आहे.