शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे महिनाभरापासून कुष्ठरोगी तपासणीच्या ओपीडीला लागले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील कुष्ठरोगींची नियमित तपासणी करण्याची ओपीडी गेल्या १ महिन्यापासून बंद आहे़ यातून कुष्ठरोगींची परवड ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील कुष्ठरोगींची नियमित तपासणी करण्याची ओपीडी गेल्या १ महिन्यापासून बंद आहे़ यातून कुष्ठरोगींची परवड सुरु झाली असून या विभागाला नियमित अधिकारीच नसल्याने ही समस्या सुरु असल्याची माहिती समोर आली आहे़जिल्हा रुग्णालयात कुष्ठरोगींना नियमित औषधी आणि साहित्य देण्यासाठी ओपीडी चालवली जाते़ याच आवारात असलेल्या कुष्ठरोग विभागाच्या सहायक संचालकांकडून रुग्णांच्या तपासण्या करुन त्यांच्यावर नियमित उपचार केले जातात़ जिल्ह्यात कुष्ठरोग शोधमोहिम राबवून कुष्ठरोगींचे प्रबोधन करण्याचा निरंतर उपक्रम कुष्ठरोग विभागाकडून सुरु आहे़ परंतू गेल्या सहा महिन्यापासून या विभागाचा जिल्ह्यातील कारभार पूर्णपणे थंडावला असून याठिकाणी नियुक्त सहायक संचालकांचा पदभार काढून घेत त्या जागी प्रभारी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत़ संबधित अधिकाऱ्याकडे राजबर्डी ता़ धडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि क्षयरोग केंद्र असे दोन चार्ज असताना पुन्हा कुष्ठरोग कार्यालयाचा भार पडल्याने कामावर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे़ जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे याबाबत कुष्ठरोगींनी तक्रारी करुनही त्यांच्यावर योग्य त्या पद्धतीने उपचार सुरु नसल्याचे समोर आले होते़ दरम्यान कोरोनामुळे ३०० नियमित ओपीडी घेणाºया रुग्णांना घरीच थांबून रहावे लागले आहे़ या रुग्णांना घरपोच औषधे आणि साहित्य पुरवठा करण्याबाबतही कारवाई झालेली नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़ दरम्यान दरवर्षी रुग्णांना वाटप होणाºया चप्पल आणि इतर साहित्याचे वाटपही रखडले असल्याची माहिती आहे़ कुष्ठरोगींना नियमित उपचार न मिळाल्यास विकृती बळावून त्यांचा आजार बळावण्याची शक्यता आहे़ कुष्ठरोग विभागात नियुक्त असलेले सहायक संचालक, आरोग्य सेवक आणि सेविका हे क्लिनिकल फॅकल्टीत येत असल्याने त्यांना कमीतकमी वेळ कोरोना कक्षांमध्ये थांबवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे़ यातून मग ओपीडी सुरु होण्याची शक्यता आहे़दरम्यान कुष्ठरोग विभागाला गेल्या काही दिवसांपासून टाळेच लागत असल्याच्या तक्रारी औषधी आणि साहित्यासाठी भेटी देणाऱ्यांनी केल्या आहेत़ याकडे गांभिर्याने लक्ष न दिल्यास जिल्हाधिकाºयांकडे तक्रार करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे़