शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

दुवा और दवा मुळेच कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 12:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरात आढळलेला जिल्ह्यातील पहिला कोरोना रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील पॉझिटिव्ह आढळलेले त्यांची ७१ वर्षीय ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरात आढळलेला जिल्ह्यातील पहिला कोरोना रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील पॉझिटिव्ह आढळलेले त्यांची ७१ वर्षीय आई, मुलगा व मुलगी यांच्यावर उपचारानंतर आता ते कोरोनामुक्त झाले. त्यांचे सलग दोन अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. चारही रुग्णांनी उचार करणारे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत ते आमच्यासाठी आणि उपचार घेणाºया सर्व कोरोनाग्रस्तांसाठी देवदूत असल्याचे सांगितले.दरम्यान, आता नंदुरबार शहरात सद्य स्थितीत एकही रुग्ण नाही. उपचार घेणारे दोन पैकी एक रुग्ण हे मालेगाव येथून बंदोबस्तावरून आलेले पोलीस कर्मचारी तर दुसरा नटावद येथील आहे. त्यांच्या संपर्कातील सर्वांचे अहवाल देखील निगेटिव्ह आलेले आहेत.जिल्ह्यातील पहिल्या रुग्णाचा दुसरा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. मात्र त्याचा तिसरा आणि चौथा अहवाल निगेटीव्ह आला. त्याच्या कुटुंबातील इतर तिघांचा दुसरा व तिसरा अहवाल निगेटीव्ह आला. त्यामुळे चौघांना आज टाळ्यांच्या गजरात आणि फुलांची उधळण करीत घरी पाठविण्यात आले. जातांना प्रत्येकाच्या चेहºयावर आनंद दिसत होता.यावेळी सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, डॉ.के.डी.सातपुते, डॉ.राजेश वसावे, डॉ.नरेंद्र खेडकर, तालुका वैद्यकीय अधिकारी जाफर तडवी, अधिपरिचारिका निलीमा वळवी आणि जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.सकाळ पासूनच जिल्हा रुग्णालय परिसरात उत्साहाचे वातावरण होते. विशेषत: परिचारिकांच्या चेहºयावर आनंद दिसत होता. गेले चौदा दिवस त्यांनी धैर्यपूर्वक केलेल्या उपचारामुळे जिल्ह्यातील पहिला रुग्ण बरा होऊन घरी जाणार होता. डॉ.भोये, डॉ.सातपुते आणि त्यांच्या टीमने १४ दिवस रुग्णांवर उत्तमरितीने उपचार केले. उपचारादरम्यान वृद्ध महिलेने जास्त विश्वासाने डॉक्टर आणि परिचारिकांना प्रतिसाद दिला, तसेच कुटुंबियांना धैर्य राखण्यास सांगितले.आज चौघा रुग्णांना उत्साहात फुलांची उधळण करून निरोप देण्यात आला. फुलांची उधळण होत असताना वृद्ध आजींचे ‘ हा बेटा हां, सबके लिए दूवा है मेरी, सबका अच्छा होगा’ हे समाधानाचे शब्द रुग्णालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतलेले परिश्रम सार्थकी लावणारे होते. एका रुग्णवाहिकेतून चौघांना घरी पाठविण्यात आले.पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी आणि जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी याबाबत समाधान व्यक्त करताना सर्व वैद्यकीय अधिकारी-कर्मचाºयांचे अभिनंदन केले आहे. आजच्या घटनेमुळे या आजारातून बरे होता येते हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण होऊन मनातली भिती कमी होईल.विश्वासाने आणि जिद्दीने उपचार करणाºया जिल्हा रुग्णालयाच्या टीमचा जिल्हावासियांना अभिमान आहे, अशा शब्दात पालकमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असून नागरिकांनी आजाराची लक्षणे दिसल्यास त्वरीत रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

कोरोनाग्रस्त रुग्णाच्या ७१ वर्षीय आईलाही कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनाही जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गेल्या २० ते २२ दिवसांपासून आजीबाई उपचार घेत होत्या. त्यांच्यासह मुलगा आणि नातू व नात यांना देखील त्या धिर देत होत्या. त्यांच्या धिरामुळे आणि डॉक्टरांच्या, नर्सेसच्या चांगल्या वागणुकीमुळे हे चारही रुग्ण या दिव्यातून बाहेर पडले. आजीबाईच्या धिराचे कौतूक केले जात आहे. आज जिल्हा रुग्णालयातून बाहेर पडतांना त्यांनी समाधानाचे भाव व्यक्त करीत येथील स्टाफला देखील आर्शिवाद दिले.

‘ये डॉक्टर लोगोंकी बडी मेहेरबानी है, जान का खतरा होने के बावजूद ये लोग मौत के कुएँ मे हमारे लिए उतरते है’ अशा शब्दात कोविड-१९ संसर्गमुक्त झालेल्या रुग्णाने आपल्या भावना व्यक्त केल्या. नंदुरबारच्या एकाच कुटुंबातील चार व्यक्तींना उपचाराअंती त्यांचे शेवटचे दोन अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर घरी पाठविण्यात आले.