शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे भाजीपाला खरेदीचे व्यवहार पहाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना संसर्ग होवू नये यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने भाजीपाला लिलाव आणि खरेदीचे व्यवहार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोना संसर्ग होवू नये यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने भाजीपाला लिलाव आणि खरेदीचे व्यवहार पहाटे घेण्याचा निर्णय घेतला आहे़ यानुसार गेल्या महिनाभरापासून कामकाज सुरु करण्यात आले आहे़ परंतू ही वेळ शेतकऱ्यांना अडचणीची ठरत असून आगामी काळात प्रशासनाने ही वेळ बदलून पुन्हा दुपारुन बाजार सुरु करण्याची मागणी होत आहे़नंदुरबारातील बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये पारंपरिक पद्धतीने भाजीपाला खरेदी विक्रीचे व्यवहार अनेक वर्षांपासून सुरु आहेत़ परंतू मार्च महिन्यात लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर हा बाजार बंद होता़ जीवनावश्यक वस्तूत समावेश असल्याने याठिकाणी भाजीपाला पुरवठा सुरु करण्यात आला होता़ यामुळे बाजार काही अंशी पूर्ववत सुरु झाला़ परंतू शेतकरी, भाजीपाला विक्रेते आणि व्यापारी यांना कोरोना संसर्ग होवू नये यासाठी बाजार रात्री भरवण्यास सुरुवात झाली आहे़ आधीच परजिल्ह्यातून भाजीपाला आवक बंद असताना रात्री सुरु झालेल्या मार्केटमुळे स्थानिक शेतकऱ्यांकडून पुरवठा होणारा भाजीपाला कमी असल्याने व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांना अडचणी येत आहेत़ जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने हे भाजीपाला मार्केट रात्री सुरु करण्यात आले आहे़ यामुळे प्रशासनाने लक्ष घालून योग्य तो निर्णय घेण्याची अपेक्षा आहे़नंदुरबार बाजार समितीत लॉकडाऊनपूर्वी प्रामुख्याने साक्री व नाशिक जिल्ह्याच्या काही भागातून हिरवा भाजीपाला नियमित विक्रीसाठी येत होता़ लॉकडाऊनमुळे हा भाजीपाला बंद झाला आहे़ नंदुरबार तालुक्याच्या गावांमधून भाजीपाला आवक सध्या सुरु असली तरी एवढ्या रात्री नंदुरबारपर्यंत पोहोचणे शेतकºयांना शक्य नसल्याने शेतकरी दुपारी किंवा सायंकाळी भाजीपाला आणून बाजार समितीत ठेवत आहेत़ यातून माल खराब होण्याची अधिक भिती आहे़ शेतात सायंकाळी मजूर मिळून भाजीपाला काढणेही शक्य होत नाही़