कोरोनामुळे एस.टी.च्या ४० टक्के फेऱ्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:28 IST2021-03-15T04:28:40+5:302021-03-15T04:28:40+5:30

नंदुरबार : कोरोना रुग्णांची वाढती संख्या, विविध शहरांमधील जनता संचारबंदी यामुळे प्रवासी संख्या कमालीची रोडावली आहे. ही बाब लक्षात ...

Corona cancels 40% of ST rounds | कोरोनामुळे एस.टी.च्या ४० टक्के फेऱ्या रद्द

कोरोनामुळे एस.टी.च्या ४० टक्के फेऱ्या रद्द

नंदुरबार : कोरोना रुग्णांची वाढती संख्या, विविध शहरांमधील जनता संचारबंदी यामुळे प्रवासी संख्या कमालीची रोडावली आहे. ही बाब लक्षात घेता नंदुरबार आगाराने जवळपास ४० टक्के फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

नंदुरबार आगाराने कमी उत्पन्न व भारमान कमी असलेल्या फेऱ्यांना कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे तसेच अनेक शहरांत जनता संचारबंदी लागू असल्याने प्रवासी संख्या कमी झाली आहे. अनेक बसफेऱ्यांमध्ये तुरळक प्रवासी राहत आहेत. त्याचा फटका एस.टी.च्या उत्पन्नावर होत आहे. ही बाब लक्षात घेता नंदुरबार आगाराने धुळे, नाशिकच्या ४० टक्के फेऱ्या कमी केल्या आहेत.

याशिवाय मुक्कामाला जाणाऱ्या बसदेखील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय पुणे, मुंबईच्या रात्रीच्या फेऱ्या नियमित सुरू राहणार असल्याचे आगारातर्फे कळविण्यात आले आहे.

Web Title: Corona cancels 40% of ST rounds