शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे विद्यार्थांच्या शिक्षणावर विपरित परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:31 IST

शासनाने कोरोनामुळे शाळा बंद केल्यावर ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय निवडला. अनेक पालकांकडे अँड्रॉइड मोबाइल आहेत. म्हणून त्यांच्या पालकांनी ...

शासनाने कोरोनामुळे शाळा बंद केल्यावर ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय निवडला. अनेक पालकांकडे अँड्रॉइड मोबाइल आहेत. म्हणून त्यांच्या पालकांनी आपल्या पाल्याला ऑनलाइन क्लासेस जॉइन करून दिले. मात्र, अनेक कारणामुळे मुलांच्या ऑनलाइन शिक्षणात सातत्य नव्हते. कारण अनेक वेळा ऑनलाइन क्लास चालू असताना, नातेवाईक अथवा इतर लोकांचे फोन किंवा कंटाळल्यामुळे अनेक मुले मध्येच गेम अथवा शिकविण्याकडे लक्ष नसल्यामुळे ऑनलाइनचा पाहिजे तितका फायदा विद्यार्थ्यांना झाला नाही.

तर अनेक पालकांकडे अँड्रॉइड मोबाइल नसल्यामुळे त्यांच्या पाल्यांना ऑनलाइन शिक्षण घेता आले नाही. परिणामी, ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणाचे तीनतेरा वाजल्याचे दिसत आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण दिसत आहे.

अनेकांनी ऑनलाइन शिक्षण घेतले असले, तरी नियमित शाळा चालू असताना मुले घरी जसा अभ्यास करतात. तसा अभ्यास या वर्षी घरी मुलांचा झाला नाही. शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षकांचा धाक असतो. घरी ऑनलाइन शिक्षण घेताना, कुणाचाही धाक नसल्याने त्याचा विपरित परिणाम मुलांच्या शिक्षणावर दिसून येत आहे. सुशिक्षित पालक मुलांना घरी थोडे-फार शिकवतात. मात्र, अशिक्षित पालक आपल्या पाल्यांना शिकवू शकत नाही. त्यामुळे या वर्षी मुले वरच्या वर्गात गेले असले, तरी त्यांचा शैक्षणिक विकास झाला नसल्याचे चित्र दिसत आहे.